कोळीगिरीत एकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

0
6

जत,प्रतिनिधी : कोळीगिरी ता.जत येथील रमेश गजानन पवार (वय 35) याने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.घटना गुरूवारी सकाळी 9 वाजता घडली.याबाबत जत पोलीसांनी आकस्मिक मुत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,मुळ कर्नाटकातील अथणी तालुक्यातील शंबरगी येथील रमेश पवार हे आईचे गाव असलेल्या कोळीगिरी येथे शेती व मजूरी करून ते आई,वडील,पत्नी मुलासह राहत होते.दोन दिवसापुर्वी शंभरगी येथे राहण्यासाठी जायाचे म्हणून कपडे,संसार साहित्य ठेवून ते बुधवारी कोळीगिरी कडे आले होते.बुधवारी मध्यरात्री पडक्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केले होते.सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी पोलीस पाटीलांना माहिती दिली.त्यांनी जत पोलीसांना कळविले.दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.अधिक तपास  विनायक शिंदे करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here