उमदीत एक गाव एक गणपती

0
Rate Card

उमदी : उमदी ता.जत येथे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.उमदी पोलीस ठाणेच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता बैठकीत ही घोषणा करण्यात आली.दुष्काळ, पुर आदी नैसर्गिक हानीमुळे जिल्ह्याभर नागरिक अडचणीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी तालुक्यात एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन केले आहे.उमदीतील 15 मंडळानी एकत्र येत लेखी संमती देत एकच गणपती बसविण्याचे ठरविले आहे.यावेळी सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी उत्सवाच्या काळात गोळा झालेल्या लोकवर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवावे.गावात शांतता व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करून डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.यावेळी कॉग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे,मानसिध्द पुजारी,बंडा शेवाळे,दावल शेख,संतोष अरकेरी,राहुल संकपाळ,मनोहर शिंदे,अफलू पाटील,संगू ममदापुरे,मुकूंद स्वामी,अशोक नागणे,अरविंद मुंगळे,संजू न्हावी,गुणवंत हिरेमठ,यलाप्पा तोरणे,रवी ऐवळे,सचिन हिरेमठ,योगेश वागदरी आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीशैल वळंसग यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.