डफळापूर | शाळकरी मुलीची छेडछाड | शाळा परिसरात तणाव | कुठाय निर्भया पथक |

0

जत,प्रतिनिधी,डफळापूर ता.जत येथील राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्यू.कॉलेज परिसरात मुलीच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहे.काही तरूणाचे टोळके राजरोसपणे शाळेच्या परिसरात फिरत असते.शाळेकडून पोलीस ठाण्याला यांची वेळोवेळी कळवूनही पोलीसाकडून जुजुबी कारवाई होत आहे.त्यामुळे असे तरूणाचे टोळके मुलींना हेरून तिला शाळेबाहेर,वाटेत अडवून छेडछाड करण्याचे प्रकार करत आहेत.काही सडकछाप मंजनूच्या या दररोजच्या प्रकाराला शाळा व्यवस्थापन कंटाळले आहे.पोलीसाची तोडकी कारवाईचा परिणाम मंगळवारी घडला.एका हुशार शाळकरी मुलीला अडवत या टोळक्यातील काही तरूणांनी छेड काढली.तिने पालकांना हा प्रकार सांगितल्याने शाळा परिसरात तणाव निर्माण झाले.मुलांच्या पालकांनी त्याला जातीचे लेबल लावून आम्ही श्रेष्ठ असल्याचा कांगावा केला.तर पोलीस ठाण्यात पोहचलेल्या मुलींच्या पालकांना गुन्हा दाखल करण्यापासून रोकण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आपले आस्तित्व पणाला लावले आहे.सकाळी झालेल्या या घटनेचे पडसाद डफळापूरात दिवसभर उमटले होते.हुशार मुलींना छेडण्याच्या या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

निर्भया पथकाचे दुर्लक्षजत,कवटेमहांळ,उमदी पोलीस हद्दीतील निर्भयांना संरक्षण देणारे पथकाचे डफळापूरकडे दुर्लक्ष झाले आहे.खरे सडकछाप मंजूनना पथकाचे आवतान असल्याने त्यांची मजल वाढली आहे.त्यामुळे आज हा छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.