ST मेगाभर्ती : किरकोळ त्रुटी असणाऱ्या उमेदवारांना सेवेत घेणार | अँड.प्रभाकर जाधव यांच्या शिष्टमंडळास परिवहन मंञ्याचे आश्वासन,

0
Rate Card

जतेत सुसज्ज बसस्थानक होणार

जत,प्रतिनिधी : जतसह दुष्काळी तालुक्यातील एसटी महामंडळाच्या मेगाभर्तीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या त्रुटी दूर करून तातडीने त्यांना सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन अपात्र उमेदवारांच्या अँड.प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.

एसटीच्या मेगाभर्तीत सांगली जिल्ह्यातील किरकोळ त्रुटीमुळे 141 उमेदवार अपात्र झाले आहेत.यासंदर्भात अँड.जाधव यांनी शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे हे सांगली दोऱ्यावर असताना भेट घेत यासंदर्भात माहिती दिली होती व दुष्काळी तालुक्यातील बेरोजगार तरूणाच्या वरचा अन्याय दूर करण्याची मागणी केली होती.त्यानुसार रविवारी परिवहन मंत्री रावते,एसटी महामंडळाचे कार्यकारी अधिकारी श्री.काळे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत अँड.जाधव यांची बैठक झाली.त्यावेळी अँड.जाधव यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील उमेदवारांच्यावर कसा अन्याय झाला याबाबत सविस्तर माहिती दिली.ना.रावते यांनी अँड.जाधव यांची बाजू ऐकून घेतली. तातडीने यांसदर्भात त्रुटी दूर करून रिक्त 141 जागेसाठी या उमेदवारांना संधी द्यावी,कुणावरही अन्याय होणार नाही यांची काळजी घ्या,आचारसहिंतेपुर्वी हा विषय संपवा, असे आदेश कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांना दिल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.यासंदर्भात आज सोमवारी एसटीचे कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांच्याबरोबर ही अँड.जाधव यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील किरकोळ त्रूटीमुळे अपात्र उमेदवारांना सेवेत सामाऊन घेण्याची आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान अँड.जाधव यांनी जत बसस्थाकांच्या दुरावस्थेबद्दल ना.रावते यांना माहिती दिली.त्यावर ना.रावते यांनी जत बसस्थानकाचे अत्याधुनिक डिजाइन तयार करून आठ दिवसात माझ्याकडे सादर करावे अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल़्या.जतमध्ये सुसज्ज बसस्थानक  बांधण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ना.रावते यांनी दिल्याचे अँड.जाधव यांनी सांगितले.

मुंबई :  मंत्रालय येथे परिवहन मंत्री, तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करताना अँड.प्रभाकर जाधव


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.