जत | गणेशोत्सवाच्या नावावर खंडणी गोळा करणाऱ्या विरोधात व्यापारी आक्रमक |

0
Rate Card

गुन्हे दाखल करणार :  पोलीस

जत,प्रतिनिधी : जत शहरातील व्यापाऱ्याकडून गणेशोत्सव वर्गणीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्या गणेश मंडळावर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने जत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलीसांना निवेदन दिले.

सध्या जत तालुक्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे बाजार पेठेवर मंदी आहे.त्यामुळे व्यापारी अडचणीत आहेत.त्यातच काही समाज कंटकाकडून गणेशोत्सवाच्या नावावर धमकावून चार ते पाच हजारापर्यत खंडणी गोळा केली जात आहे.शहरातील काही पंटर असे गणेश मंडळे स्थापून थेट खंडणी गोळा करत असल्याचे व्यापाऱ्यांनी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिले.संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.अशा पध्दतीने दबाव टाकणाऱ्या मंडळाच्या विरोधात नावासह तक्रार द्यावी,त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन पोलीसांनी दिले.रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक इराण्णा निडोणी,मंजू मोगलीसह सुमारे दोनशे व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते.

गणेशोत्सवाच्या नावावर खंडणी गोळा करणाऱ्यावर कारवाई करा या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.