प्रयास फांऊडेशच्या वतीने पुरग्रस्तांना संसारउपयोगी साहित्याचे वाटप

0
Rate Card

डफळापूर, वार्ताहर : निसर्गाच्या प्रलयकारी प्रकोपामुळे सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात सर्वच वाहून गेलेल्या नागरिकांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चालू केलेल्या प्रयास फांऊडेशच्या वतीने संसार उपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

पलूस तालुक्यातील

सुखवाडी व खटाव येथील 300 कुंटुबियांना या किटचे वाटप करण्यात आले.15 दिवसांत पुर्वी प्रयास फ़ौडेशनच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळाला.आलेली मदत प्रत्यक्ष गरज असेल तिथे पोहचवण्याचे काम टीम प्रयासने केले.यात जीवनावश्यक वस्तूंचे 300 किट व 300 साड्या,300 लहान मुलांचे कपडे आणि 300 जेष्ठांना अंतर्वस्त्रे व शालेय विद्यार्थाना प्रत्येकी दोन पेन आणि वही देण्यात आली.यावेळी प्रयास टीमने सर्व ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले,तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी करून जास्त प्रमाणात भरीव मदत करून विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर कसे आणता येईल याविषयी चर्चा केली.प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रयास टीमचे सदस्य उपस्थित होते.

प्रयास टिमच्या वतीने पुरग्रस्त भागातील सुखवाडी व खटाव येथे संसारउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.