आंवढीचे शशिकांत कोडग मराठी समाज संघटनेचे उत्तरप्रदेश संघटनमंत्री

0

आंवढी,वार्ताहर : आवंढी (ता.जत) येथील शशिकांत सुभाष कोडग उर्फ़ बबलु शेठ यांची मराठी समाज उत्तरप्रदेश या संघटनेच्या प्रदेश संघटनमंत्री पदी निवड करण्यात आली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.मुळ आंवढीचे असलेले बबलू शेठ यांच्यावर या निमित्ताने संपूर्ण उत्तरप्रदेश मध्ये संघटन मजबूत करण्याची  जबाबदारी सोपवली आहे.यापूर्वी ही शशिकांत कोडग यानी 1 वर्ष अंम्बेडकर नगर ज़िल्हाध्यक्ष व 2 वर्षें मराठी समाज उत्तरप्रदेशच्या प्रदेश मंत्री पदी यशस्वीपणे काम केले आहे.त्यानी केलेल्या उल्लेखनीय कामाची दख़ल घेवून संघटनेने त्यांना प्रदेश संघटनमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे.यावेळी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालत सत्कार करण्यात आला. यावेळी संघटेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री.पाटील,वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर,महामंत्री पांडुरग राऊत, वरिष्ठ संघटनमंत्री संतोष पाटील,कोषाध्यक्ष गजानन माने पाटील, प्रवक्ते गणेश हारताले,प्रदीप गाईकवाड, शशिकांत धनवडे,उत्तम शेठ आदीची उपस्थित होते.

आंवढीचे शशिकांत कोडग यांची मराठी समाज संघटनेच्या उत्तरप्रदेश संघटनमंत्री निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.