स्मार्ट,कॉम्प्युटर आणि सायबर गुन्हे

0
Rate Card

स्मार्टफोन,लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युवकांमध्ये सोशल मीडिया हावी आहे. व्हॉट्स अप, फेसबुकसह अनेक सोशल मीडिया माध्यमे सक्रिय आहेत. यांचे वापरकर्तेदेखील कोटींच्या घरात आहेत.  त्यामुळे मोबाईल, सोशल मिडियावाल्यांचा बिझनेस जोरात सुरू आहे. या मीडियात आणखीही दिवसेंदिवस भर पडत आहे. मोबाईल आता आल्याने ऑनलाईन खरेदीचा बाजारात वाढला. शॉपिंग ऑनलाईन झाला. बाजारात जाऊन चोखंदळपणा दाखवण्याचा प्रकार कमी होत आहे. वेळ वाचला आहे. ऑनलाईन वस्तू,कापडांचे प्रकार पाहायला मिळू लागले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ऑनलाईन विक्रीचा प्रकार सर्वाधिक आहे.मोबाईल,कॉम्प्युटरमुळे शासकीय कामे सोपी आणि सुटसुटीत झाली आहेत. कामांची टेंडर घेण्याचा प्रकारही ऑनलाईन झाल्याने काही प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. महसूल पुरावे,दाखले ऑनलाईन झाल्याने इथेही चिरीमिरीला आळा बसण्यास यश आले आहे. सर्वात मोठा फायदा झाला आहे तो ऑनलाईन पैशाच्या देवघेविचा! काही क्षणात आपण आता कुणालाही आणि कितीही पैसे पाठवू शकतो. त्यामुळे बऱ्याच अडचणी, समस्या कमी झाल्या आहेत.ही गोष्ट लाभाची असली तरी याचे अज्ञान, पुरेसे कौशल्य आत्मसात केले नसल्याने दुष्परिणाम जाणवू लागले आहे. 

या यंत्रणेवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. परदेशात अशा प्रकारचे सायबर हल्ले आघाडीवर आहेत. गुन्हेगारीचे तंत्र आणि मंत्र बदलले आहे. आणि लोकांना घरबसल्या घडवण्याचे गुन्हे होऊ लागले आहेत. अनेक देशात अशाप्रकारच्या गुन्ह्यांची डोकेदुखी ठरलीआहे. आपल्या देशात आपण अशा प्रकारची यंत्रणा लोकांना वापरायला दिली असली तरी त्यापासून होणारे तोटे, आपण लोकांना समजावून सांगितले नाही.  ते हाताळण्याचे कौशल्य सांगितले नाही. त्याचे प्रशिक्षण दिले नाही. त्याचे जसे फायदे सांगितले तसे तोटे सांगितले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात गुन्हेगारी शिरली आहे,तशीच याही क्षेत्रात गुन्हेगारी थैमान घालत आहे. अनेकांना लाको-कोट्याने हातोहात फसवले जात आहेत. राज्यात आणि भारतात पुणे शहर सायबर गुन्हा क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याखालोखाल मुंबई,बंगळुरू शहरांचा समावेश आहे. हे गुन्हे आता गावपातळीवर आले आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबाबत देशातील आणि राज्यातील सायबर विभागाने  आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची आहे. 

भ्रष्टयाचार अचूक आर्थिक व्यवहारांवर सरकारचा भर आहे. परंतु, याला तंत्रज्ञान निरक्षरता, व्हायरसचा हल्ला, फेसबुककडून लीक झालेला डेटा, काही दिवसांपूर्वी यूर्जसना ट्विटरने केलेले पासवर्ड बदलण्याचे निवेदन, अशा अनेक बाबींचा समावेश आहे. सोशल मीडिया, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाचा आज अर्मयाद वापर होत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यम बँकांच्या सर्व्हरवर सायबर हल्ले होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या वर्षी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर गुन्हेगारांनी सायबर हल्ला करून बँकेला तब्बल ९४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले होते. याआधीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे सायबर सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्‍चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे तरच आपण त्यातील इंटरनेट बँकिंगसारख्या साधनांचा चांगला फायदा आणि सोशल नेटवर्किंगचासुद्धा सकारात्मक उपयोग करू शकतो. सायबर गुन्हे कसे घडतात?, त्याचा परिणाम काय होतो?, असे हल्ले थांबवण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात?, सायबर गुन्हे आणि सुरक्षितता, व्हायरस, सोशल मीडियाचा वापर, ऑनलाईन माध्यमांद्वारे होणारी फसवणूक आणि इंटरनेटचे व्यसन यासारख्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सायबरकडून केले जात आहे. सायबर गुन्हे विशेषत: हॅकिंग, लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्य़ामध्ये मोडतात. सोशल नेटवर्किंगद्वारे धमक्या देणे, आर्थिक गुन्हेगारी, मुलांविरुद्ध गुन्हे आणि इ-मेलद्वारे फसवणूक हे सुद्धा सायबर गुन्हेगारीच्या कक्षेत येतात. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दररोजच्या जीवनातील विविध पैलूंमधील तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे सायबर गुन्हेगार बर्‍याच मोठय़ा प्रमाणावर नागरिकांवर हल्ला करत आहेत. हे एका जागी बसून करणे गुन्हेगारांसाठी सोपे झाले आहे. माहितीच्या देवघेवीचे हे तंत्रज्ञान वापरताना ते करणार्‍या व्यक्ती या बरेचदा पूर्णपणे अनोळखी असतात, यात काही सीमारेषा नसतात, म्हणजेच जगातील कोणत्याही देशातून कोणी तुमच्याशी संवाद साधेल. यातील बरेच गुन्हे हे अनोळखीपणाचा फायदा घेऊन केले जातात. सायबर सुरक्षा, संगणक सुरक्षा किंवा आयटी सुरक्षा म्हणून ओळखले जाते. माहिती, तसेच प्रदान सेवा व्यत्यय किंवा सायबर हल्ल्यापासून हार्डवेअर, सॉफ्टवेअर चोरी किंवा नुकसान होऊन नये म्हणून माहिती प्रणालीला संरक्षण दिले जात आहे. हार्डवेअर, भौतिक प्रवेश नियंत्रण, तसेच नेटवर्क प्रवेश, डेटा आणि कोड इंजेक्शनद्वारे माहिती पळविली जाऊ शकते, अशा हानीपासून संरक्षण करण्यासाठी आणि ऑपरेटरद्वारे गैरप्रकार होऊ नये म्हणून विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. समाजामध्ये संगणक प्रणालींवर विश्‍वास वाढत आहे. या प्रणालीचे आता महत्त्वही वाढले आहे. सीमारेषेपार बसलेले दहशतवादी व्हॉट्सअँप आणि लिंकच्या सहाय्याने भारतीय नागरिकांना जनिशाना बनवत असून त्यांची खासगी माहिती मिळवणे हे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट असते. बर्‍याचवेळी विशिष्ट क्रमांकाद्वारे खोट्या बातम्यासुद्धा पसरवल्या जातात. सायबर एक्सपर्टच्या मते अशी ६0 ते ७0 ग्रुप आहेत. हे हॅकर्स सायबर घुसखोरी करून युझर्सच्या फेसबुक पासवर्डसह अनेक महत्त्वाची माहिती हॅक करत आहेत. वाढते सायबर हल्ले लक्षात घेता आपण जितके तंत्रज्ञानाकडे वळू तितकेच आपल्याला दक्ष राहावे लागणार आहे. यापुढे प्रत्येक राष्ट्राला आव्हान असणार आहे ते सायबर हल्ल्याचे. असा हल्ला कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही देशावर करता येऊ शकतो. याची शंभर टक्के हमी देणारा रॅनसमवेअर व्हायरसचा हल्ला झाला होता. संगणकात शिरून संपूर्ण फाईल्सवर ताबा मिळवायचा आणि खंडणीची मागणी करायची, असे या हल्ल्याचे उद्दिष्ट होते. ही जगाला चिंतेत टाकणारी गोष्ट आहे.

मच्छिंद्र ऐनापुरे, जात 7038121012

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.