बेळोंडगी,वार्ताहर : बेंळोडगी ता.जत येथील तीन घरे फोडून सोन्याचे दागिणे रोख रक्कमेसह सुमारे 80 हाजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत उमदी पोलीसात सोमनिंग नागाप्पा बिराजदार वय 20,रा.बोर्गी(बु) यांनी तक्रार दिली आहे.अन्य तक्रारी रात्री उशिरापर्यत दाखल नव्हत्या.अधिक माहिती अशी, बेळोंडगी ता.जत येथील सोंमनिंग बिराजदार व त्यांची आई मलव्वा,आजी सौ.सायव्वा यांच्यासह बेंळोडगी येथे राहत आहे.सकाळी घराला कुलूप लावून बिराजदार कुंटुबियासह करबसाप्पा आवटी यांच्या शेतात शेतमजूरीला गेले होते.यांचा फायदा घेत चोरट्यांनी सकाळी नऊच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोंखडी पेटीतील 25 हाजार रक्कमेची सोन्याची भोरमाळ,कर्ण फुले,दोन स्मार्ट मोबाईल,30 हजार रोख रक्कमेसह 60 हाजाराचा मुद्देमाल पळविला.मल्लाप्पा श्रींमत होर्ती हे कामानिमित्त बाहेर गावी तर कुंटुबातील अन्य सदस्य जनावरे चरविण्यासाठी गेले होते.यांचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचे घर फोडून आत प्रवेश करत तर त्यांच्या घराजवळचे तम्माराया होर्ती यांच्या घरात कोण नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करत सोन्याचे दागिणे,रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.दिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेने खळबंळ उडाली असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.उमदी पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.बेंळोडगी ता.जत येथे दिवसा घरे फोडून चोरट्यांनी साहित्य विस्कटले होते.