जत,प्रतिनिधी : सिध्दनाथ (ता.जत) येथील अल्पवयीन मुलाच्या खून
प्रकरणी आरोपी विजय शिवाजी माने (रा.वार्ड न.5,मंगळवार पेठ जत) याला कलम 302 नुसार जन्मठेप,25 हजार,दंड न दिल्यास 2 वर्षे सश्रम कारावास,307 अन्वेय 7 वर्षे सक्तमजूरी, 25 हजार दंड व दंड न दिल्यास एक वर्ष सश्रम कारावास,तर कलम 324 नुसार 1 वर्षे सक्तमजूरी,5 हजार दंड व दंड न दिल्यास 1 वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.सांगली येथील सत्र न्यायाधीश विजय पाटील यांचेसमोर हा खटला सुरू होता.