जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अल्पवधीत प्रसिद्ध झालेले व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांशी निकटचे संबधित असलेले बालगाव मठाचे मठाधिपती डॉ.अमृतानंद महास्वामीजी यांनी राजकारणातून माघार घेतली आहे.तसे त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ टाकत यापुढे मी योग,अधात्मावर काम करणार असल्याची घोषणा केली आहे.
डॉ.अमृतानंद स्वामीजी जत विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक होते,अशी चर्चा सुरू होती.मात्र सोमवारी फेसबुकवर त्यांनी मी यापुढे अधात्म,योग,शेती,कृषी स्वांलबन,रक्षा,यावर काम करणार आहे. राजकारण चांगले आहे.मात्र राजकारणात काही चुकीचे लोग आल्याने राजकारण गढूळ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.राजकारणात अधात्म स्वामीजी काम करू शकतात.जत तालुक्यातील काही लोकांना मी विधानसभा लढवावी असे वाटत होते.त्यामुळे भष्ट्राचार कमी होईल,विकास होईल असे वाटत होते.मात्र त्या सर्वाचा सन्मान करून मी यापुढे राष्ट्राला पुढे आणण्यासाठी योग,अधात्म जगभर पोहचविण्यासाठी काम करणार आहे.तशी माझ्या गुरूची आज्ञा आहे.असे अमृत्तानंद स्वामीजीनी म्हटले आहे.मात्र यापुढेही जत तालुक्यातील भाजपमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्व असणार आहे.या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या आशिर्वाद मिळविण्यासाठी काही उमेदवार उंबरे झिझवणार हे निश्चित आहे.