ट्रक चालकांना बेदम मारहाण,शेगावच्या चौघांना अटक
जत,प्रतिनिधी : जत -शेगाव रोडवर ट्रक चालकांना लुटणारी दुसरी टोळी पोलीसांनी जेरबंद केली.यात किरण रामराव शिंदे,नागराज चन्नापा गुत्तेवार,मोहन विलास निकम,शिवाजी कुडलिंक लांडगे (सर्वजण रा.शेगाव)या संशयित चोरट्यांचा समावेश आहे
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सुनिल शिवाजी शिंदे यांच्या मालकीचा (एमएच-12,क्यूजे-9435)हा ट्रक लोकापूर येथून सिंमेट भरून पुणेकडे निघाला होता.शेगाव पासून एक किलोमीटर सिंगनहळ्ळी रोडवर संशयित चोघांनी चालक गणेश बापूराव इंगवले (रा.मोहा,ता.कंळब,जि.उस्मानाबाद)याला दुचाकी(एमएच-10,एव्ही-3162) अडवी लावून दगड,दुचाकीच्या केबलने बेदम मारहाण करून एक सँमसन कंपनीचा मोबाइल,12 हजार रूपये काढून घेऊन पलायन केले.दरम्यान ट्रक चालक गणेश इंगवले यांनी ट्रक परत शेगावमध्ये आणत गावातील काही नागरिकांकडून चौकशी करून संशयिताची नावे घेत,जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.दरम्यान जत पोलीसांनी घटनास्थळी पोहचत संशयित किरण शिंदे,नागराज गुत्तेदार,मोहन निकम,शिवाजी लांडगे यांना ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना जत न्यायालयात हजर केले असता 1 ऑगष्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान प्रकरण संशास्पद असल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यत मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू होते.मात्र फिर्यादीने गुन्हा दाखल केल्याने संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहा.पो.निरिक्षक अनिल माने करत आहेत.