डफळापूर | पाणी पुरवठ्याच्या टिसीवर 15 आकडे | टिसी जळाल्यावर कारवाई करणार काय |

0

अतिरिक्त भाराने टिसी जळाल्यावर महावितरण कारवाई करणार काय : प्रतापराव चव्हाण

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीच्या टिसीवर खाजगी शेतकऱ्याकडून बेकायदेशीर आकडे टाकून तलावातील पाणी उपसा सुरू केला आहे.त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या टिसीवल अतिरिक्त भार पडून टिसी जळण्याची भीती निर्माण झाली आहे.महावितरणने तातडीने याला प्रतिबंध करावा अशी मागणी उपसरपंच प्रतापराव चव्हाण यांनी केली.

डफळापुर गाव भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावालगतच्या तलावातून पाणी पुरवठा योजना आहे. पाणी पुरवठा विहिरीसाठी स्वतंत्र टीसी बसविला आहे.त्या टिसीवर तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा करण्यासाठी खाजगी शेतकऱ्यांनी जादा हा क्षमतेच्या मोटारी चालू करण्यासाठी आकडे टाकले आहेत.सुमारे 15 ते 20 आकडे टाकल्याने अतिरिक्त भार टिसीवर पडला आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी सुद्धा अनेक वेळा चालू होत नाही. अतिरिक्त भाराने टिसी जळण्याची भीती निर्माण झाली आहे.पाणी उपशामुळे भविष्यात गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.तर टिसी जळाल्यावर तर परिस्थिती गंभीर होणार आहे. डफळापूरातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार माहिती असतानाही आकडे टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने बेकायदा वीज वापरणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी चव्हाण यांनी शेवटी केली.

चार दिवसात तलावातील पाणी संपणार
डफळापूर तलावात टंचाईतून पाणी सोडले होते.पाणी उपसाबंदी आहे.तरीही शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू आहे.सध्या तलावात चार दिवसात संपेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. मोटारीने पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण सहयोग आहे.त्यामुळे ते तोंडावर बोट या भूमिकेत आहे.आम्ही ओरडून वैतागलो असल्याचेही यावेळी प्रतापराव चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.