डफळापूर,वार्ताहर : डफळापूरातील जुगार अड्डे,मटका,सिंदी,बेकायदा दारू सारख्या अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात आज ग्रामपंचायतीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.संरपच बालिकाकाकी चव्हाण सह काही सदस्यांनी अवैध धंदे पुर्णत: बंद करण्याची मागणी केली आहे.
आज ग्रामपंचायची महत्वाची बैठक होत आहे.त्या गावातील या अवैध धंद्यावर चर्चा होणार आहे. तसा ठराव घेऊन पोलीसांनी दिला जाणार आहे.
डफळापूर ऐतिहासिक गावात जुगार,मटका,सिंदी सारख्या अवैध धंद्याने अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत.हे अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी दैंनिक संकेत टाइम्सने मोहिम उघडली आहे.सततच्या बातम्याच्या मुळे गावातील मटक्याला आळा बसला आहे.जुगार अड्डे चोरून सुरु असल्याची चर्चा आहे.जुगार अड्डे,सिंदी,बेकायदा दारू बंद करण्यासाठी आता ग्रामपंचायत आक्रमक होणार आहे.त्याशिवाय अवैध धंदे बंद करावेत असे काही सुज्ञ नागरिकाकडून निवेदन दिले जाणार आहे.
स्थानिक पोलीसाची छुपी मदत
डफळापूरातील बेकायदा धंद्यांना पोलीसांची छुपी मदत कारणीभूत आहे.पोलीसांनी मनापासून ठरविले तर कोणताही अवैध धंदा सुरू राहणार नाही.त्यासाठी जतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर लक्ष घालण्याची गरज आहे.





