जाड्डरबोबलाद,वार्ताहर : जत तालुक्यातील प्रसिद्ध डाळींब व द्राक्ष व्यापारी श्री.गुरुदत्त फ्रुट कंपनीचे अध्यक्ष सिध्दू बसरगी(जाडरबोबलाद) यांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व आपुलकीमुळे संख येथील कार्यक्रमात आदर्श शेतकरी डॉ.भाऊसाहेब पवार यांनी एक तोळ्याची सोन्याची अंगटी भेट देऊन भव्य सत्कार केला. त्यावेळी विविध मान्यवर,शेतकरी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
जाड्डरबोबलाद येथील व्यापारी सिध्दू बसरगी यांना एक विश्वासु व्यापारी म्हणून ओळखले जाते.ते स्वतः एक शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून करतात.त्याशिवाय जाड्डरबोबलाद समाजसेवक म्हणूनही ते जनतेच्या सुखं, दुःखाच्या प्रसंगी उपस्थित राहुन मदत करत असतात.व्यापारी,शेतकरी व एक जनतेच्या हितासाठी हिरीरीने सहभाग घेणारा लोकसेवक अशा तिहेरी जबाबदाऱ्या पेलणारे सिध्दू बसरगी अगळेवेगळे व्यक्तिमहत्व आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत समखचे आदर्श शेतकरी डॉ.भाऊसाहेब पवार यांनी त्यांचा गौरव करत सोन्याची अंगटी भेट दिली.
जाड्डरबोबलाद येथील आदर्श व्यापारी सिध्दू बसरगी यांचा एक तोळ्याची सोन्याची अंगटी देऊन डॉ.भाऊसाहेब पवार यांनी गौरव केला.