येळवीत तीन ते सात मे दरम्यान येळवी महोत्सवाचे आयोजन

0

★ महापूरुषांची जयंती, विविध कलागुणी स्पर्धा, रक्तदान शिबीर, व्याख्यानाचे आयोजन

जत,वार्ताहर : जत तालुक्यातच नव्हे तर सांगली जिल्ह्यतील नामांकित, केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राने आदर्श संस्था म्हणून गौरवलेल्या जत तालुक्यातील येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे याहीवर्षी तीन ते सात मे दरम्यान ‘ येळवी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महापुरुषांची जयंती उत्सव, विविध कलागुण दर्शन स्पर्धा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी दिली.

तीन मे रोजी सायंकाळी भव्य डे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. श्री समर्थ शिवप्रभु हायस्कुलच्या प्रागणात  स्पर्धेचे उदघाटन रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, माजी सरपंच चंद्रकांत वगरे, ज्येष्ठ नेते पंचाक्षरी अंकलगी, रासपचे शहराध्यक्ष भूषण काळगी उपस्थित राहणार आहेत. पाच मे पर्यत ही स्पर्धा चालणार आहे.

पाच मे रोजी खास विद्यार्थ्यासाठी श्री समर्थ शिवप्रभु हायस्कुल येथे जनरल नॉलेज स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन मारुती मदने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दुडाप्पा तेली, उपसरपंच सुनील अंकलगी उपस्थित राहणार आहेत.

Rate Card

जनरल नॉलेज स्पर्धेनंतर रांगोळी स्पर्धा महिला व मुली मोठा व छोटा गटात रांगोळी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्या निलाबाई कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत सदस्या सविता सुतार , कोंडाबाई सुभाष कुलाळ उपस्थित राहणार आहेत.

सहा मे रोजी सकाळी नऊ वाजता येळवी ग्रामपंचायतीसमोर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सांगली येथील प्रा.डॉ. सुनीता बोर्ड,  शाहीन शेख यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचे उदघाटन म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनिल अंकलगी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर , नगरसेविका वनिता साळे, सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनिल अंकलगी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासो शिंदे, धोंडीराम कुलाळ ,सुरेश जगताप, कोंडिबा माने उपस्थित राहणार आहेत.

सात मे रोजी सकाळी रंगभरण चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन येळवी सोसायटीचे संचालक शंकर आवटे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश आवटे, मारुती मदने, विरपाक्ष येवले,विजय रुपनूर, गजानन पतंगे, संतोष पोरे उपस्थित राहणार आहेत.

सात मे रोजी सायंकाळी महोत्सवाचा समारोप होणार आहे. मुख्य समारोपप्रसंगी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा व विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उदघाटन जिल्हा बँकेचे संचालक प्रमुख विक्रमसिह सावंत यांच्या हस्ते होणार आहे.  प्रमुख पाहुणे म्हणून अनिल अंकलगी, बाबासो कोडग, मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.