टँकरचे क्रॉस चेकिंग : जिल्हाधिकारी, छावणीच्या परिपूर्ण प्रस्तावास मंजूरी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील छावणीच्या परिपूर्ण प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येतील, तत्पूर्वी प्रस्तावाचे तालुकास्तरीय समितीकडून तपासणी करण्यात येईल.त्याचबरोबर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची शुद्धता व अनियमित पणाबदल क्रॉस चेकिंग करण्यात येईल. कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा करणाऱ्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल,अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली

जत येथील आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत डॉ.चौधरी बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,प्रांताधिकारी तुषार ठोंबरे तहसीलदार सचिन पाटील,बिडिओ अर्चना वाघमळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Rate Card

डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले,जत तालुक्यातील दुष्काळाबाबत प्रशासन सतर्क आहे.सध्या पाणी,चारा टंचाई,कुपनलिका दुरूस्ती बाबत कारवाई सुरू आहे.अंकलगी तलावातील पुर्व भागातील गावांना पाणी पुरवठा केला जातो.सध्या तेथील पाणी साठा संपत आला आहे.त्यामुळे म्हैसाळ योजनेतून सनमडी  तलावात पाणी सोडले आहे.तेथून टँकर भरण्याची सोय करण्यात येईल.सध्या पाणी टंचाई असणाऱ्या गावांना म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.तालुक्यात सध्या मागेल तेथे टँकर देण्यात येतील.चारा छावणीचे चार प्रस्ताव आले आहेत.त्यासाठी तालुकास्तरीय समितीकडून प्रस्तावाची तपासणी करून परिपुर्ण प्रस्तावास मंजूरी देण्यात येतील.जि.प.चे मुख्य कार्यधिकारी अभिजित राऊत यांनी बंद कुपनलिका दुरूस्तीसाठी व पंचायत समिती कडून टंचाईसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत,असे सांगितले.


जत येथील पत्रकार बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चोधरी,अभिजीत राऊत 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.