जतेत पार्‍याची उसळी कायम; @ 41

0


उमदी : जत तालुक्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा 43 अंश सेल्सिअसला जाऊन टेकला. एप्रिल महिन्यात मागील 10 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. जतच्या सरासरी तापमानात दहा डिग्रीने वाढ झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीची झळ सगळ्यांनाच बसत आहे.
तापमान वाढीस वृक्षतोडीसह अनेक कारणे आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचनाही दिल्या होत्या, पण त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गेल्या 10-15 वर्षांत तापमानात हळूहळू वाढ होत गेली, पण यंदाइतके तापमान गेल्या 10 वर्षांत वाढलेले नाही. यंदा जानेवारीपासूनच कडाक्याचे ऊन सुरू झाले. फेब्रुवारी, मार्चमध्ये तीव्रता वाढून सरासरी तापमान 35 डिग्रीपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यांत पारा काय असणार? याचा अंदाज आला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत गेली असून, आता हे तापमान 43 डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.

उष्माघाताचे प्रमाण वाढले
जीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठ दिवस पारा वाढत जाणार असल्याने उष्म्याच्या तडाक्याने वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.जास्त वजन असणाऱ्या, रक्तदाब, साखरेच्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास अधिक होऊ शकतो. बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
नागरिकांनी काय करावे
शक्य असल्यास दिवसातून दोनवेळा अंघोळ करावी.
स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.
फ्रीजमधील एकदम थंड पदार्थ खाऊ नयेत.
थंड माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
दिवसाला साधारणत: 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.