सांगली : निर्धारीत वेळेपेक्षा अधिक काळ भाषण केलेबाबत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.जत तालुक्यातील बिळूर येथील प्रभूदेव महादेव यलगर यांच्याकडून प्लॅस्टीक कॅन मधील 70 लिटर ताडी, एक दुचाकी असा एकूण 36 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एफआयआर दाखल करण्यात आला. नाजिरसाब खुडबूसाब नदाफ यांच्याकडून प्लॅस्टीक घागरीमधील 50 लिटर ताडी, एक दुचाकी असा एकूण 21 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एफआयआर दाखल करण्यात आला.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 20 एप्रिल रोजी दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.