डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तिसऱ्यावेळी जत पोलीसांनी छापा मारत 14 जूगाऱ्यांना रंगेहाथ पकडत 6,610 रूपये रोख,चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.अड्ड्याचा मालक पल्हाद हैबती गडदे (रा.बाज),अरविंद सज्जू बनसोडे,शिवाजी पंडित कोळी,रामचंद्र संत्तू बनसोडे,सन्नाप्पा रामचंद्र कोळी,भाऊसाहेब दऱ्याप्पा पाटील,बबन तुकाराम गडदे,दिपक तानाजी मलमे,संतोष आप्पा खांडेकर,निरिक्षक चंदर उबाळे,सुनिल भाऊसाहेब वाघमारे,राहुल शहाजी पांढरे,बिरूदेव रामा शिंदे,(सर्वजण रा.डफळापूर),दत्तात्रय दौलाप्पा कोळी(रा.खलाटी)यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,डफळापूर स्टँडनजिकच्या बाबा प्लाझा या बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावर मालक पल्हाद गडदे याचा राजरोसपणे जुगार अड्डा सुरू होता.यापुर्वी या अड्ड्यावर विशेष पथकाने छापा टाकला होता.त्याचबरोबर अन्य एका जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. तरीही हा अड्डा अगदी स्टँडजवळ सुरू होता.शुक्रवारी डिवायएसपी दिलीप जगदाळे, पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कत्ते यांच्या पथकांने छापा टाकला, त्यावेळी येथे 14 जुगाऱ्याकडून पैसे लावून तिन पानी जुगार सुरू होता.त्यांना रंगेहाथ पकडत पोलीसांनी ताब्यात घेतले.वैयक्तिक हमीवर त्यांना रात्री उशिराने सोडून दिले.दरम्यान डफळापूर ओस्टपोस्ट पोलीसांच्या आर्शिवादाने सुरू असलेल्या अवैध धंदे जिल्हा पोलीस प्रमुखाच्या विशेष कारवाईने बंद
झालेले नाहीत.जुगार,मटका,बेकायदा दारू अड्ड्यावर छापा पडून कारवाई होती.त्यांनतरही मोठ्या जोमात हे अवैध धंदे सुरू आहेत.याला पोलीसाचे बंळ असल्याने अगदी स्टँड परिसर,सार्वजनिक चौक, बुवानंद मंदिरालगत हे अवैद्य धंदे सुरू आहेत.यापुर्वी डफळापूर परिसरातील 10 पेक्षा जास्त वेळा मटका,जुगार,व बेकायदा दारू अड्ड्यावर कारवाई झाली आहे.ते धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत.अनेक कारवाईत जप्त केलेल्या रक्कमाही कमी दाखविण्याचे प्रकार झाल्याची चर्चा आहे.त्याशिवाय मोठ्या आर्थिक तडजोडीचीही चर्चा डफळापूरात सुरू आहे.
डफळापूर बनतंय अवैद्य धंद्याचे केंद्रडफळापूर ओस्टपोस्ट अंतर्गत येणाऱ्या डफळापूर, बाज,अंकले,शिंगणापूर,जिरग्याळ सह सर्वच गावात सर्व अवैध धंदे अगदी उघड्यावर सुरू आहेत.जुगार,मटक्याचे तर डफळापूर प्रमुख केंद्र बनले आहे.याशिवाय भर लोकवस्तीत डिनोटर सारखे स्फोटक पदार्थाचा साठा साठवला जात आहे.हा सर्व प्रकार महिन्याकाठीच्या तोडजोडीमुळे पोलीसाच्या नजरेला दिसत नाही,हे विशेष..