जत | जतेत हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात |

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात सालाबाद प्रमाणे गांधी चौकातील मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रांग लागली होती. पहाटे पाच वाजता अभिषेक महापूजेनंतर कार्यक्रमास सुरूवात झाली. पाळणा,पाळणा गीत,भजन, किर्तन,तर सायंकाळी आदिओम् प्रस्तुत स्वरसाधना हा हिंदी-मराठी भक्तीगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा भजन,किर्तनाच्या गजरात,विधीवत धार्मिक विधीने झाला.जन्मोउत्सवास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.जत शहरातील मुख्य बाजार पेठेत असणाऱ्या या हनुमान मंदिराचा हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे.मंदिराची डागडूजी करण्यात आली आहे. लोकवर्गणी,व काही दानशुराच्या देणगीतून मंदिरांचे स्लंब, रंगरंगोटी लोखंडी गेट,छोटी मंदिरे,साहित्य ठेवण्यासाठी विविध खोल्या बांधण्यात आल्या आहेत.सर्व सुसज्ज बांधकामामुळे प्रशस्त मंदिर बांधकाम करण्यात आले आहे.जयंतीनिमित्त हनुमानाच्या मुख्य गाभाऱ्यात मूर्तीला फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते. पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.जीर्णोद्धार समितीच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी गुरुनाथ बिजरगी, प्रदीप जेऊरकर,इराण्णा निडोणी, राहुल पोतदार,विजय पवार, कनिष्क मोदी,श्रीशैल पट्टणशेट्टी यांनी नियोजन केले.

Rate Card

जत येथील हनुमान मंदिरात जंयतीनिमित्त मुर्तीला फुलांनी सजविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.