जत : रावळगुडेंवाडी (ता.जत) येथे बहुजन वचिंत आघाडीचा प्रचार का केल्यास म्हणून एकास मारहाण केल्याबद्दल दोघा विरोधात जत पोलीसांत गुन्हा दाखल झाला.शाबूराव पावडी करजगी(रा.रावळगुंडेवाडी)असे मारहाण झालेल्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी,शाबूराव करजगी हा बहुजन वचिंत आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत होता.त्याला गावातील मल्लिकार्जुन रमेश हिरगोड,व प्रभाकर रमेश हिरगोंड या दोघांनी संजयकाका सोडून कुणाचाही प्रचार करायचा नाही म्हणून मारहाण करून शिवीगाळ केली.अशी फिर्याद शाबूराव करजगी यांनी दिली आहे.
|