माडग्याळ,वार्ताहर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर प्रचारार्थ जत तालुक्यातील प्रचारार्थ उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.जत तालुक्यावर सत्ताधारी खासदारांनी अन्याय केला आहे.अनेक प्रश्न सोडविण्यात ते कमी पडले आहेत.वंचित समाजाला गोपीचंद पडळकर न्याय देऊ शकतात.त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन युवक नेते कामाण्णा बंडगर यांनी केले.
जत तालुक्यातील पूर्व भागातील माडग्याळ, व्हसपेठ,राजाबोचीवाडी, गुड्डापूर,सोन्याळ,जाड्डरबोबला
बंडगर पुढे म्हणाले,देश व राज्यातील सरकारने धनगर आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही.त्याशिवाय वंचित समाजाच्या प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी कमी पडले आहेत.जतसह सांगली जिल्ह्यात नवे पर्व आणण्यासाठी बहुजनाचा नेते गोपीचंद पडळकर निवडणूकीच्या रिंगणात आहेत.त्यांचा विजय म्हणजे जतच्या सर्वागिंन विकासासाठी विजय आहे.त्यामुळे मतदारांनी पडळकर यांना साथ द्यावी असेही शेवटी बंडगर म्हणाले.
जत पूर्वभागातील जाडरबोबलाद,उमदी,मुचंडी जिल्हा परिषद संघाची जबाबदारी कामाण्णा बंडगर यांच्याकडे आहे.अशोक बनेन्नवर,गडदे साहेब,बिरापा चौगुले,महेश कांबळे, कामदेव कोळेकर,राजू माळी, इराणा माळी,दादा बंडगर,कामदेव कोळेकर, महेश कांबळे,राजू माळी, नागेश ऐवाळे प्रचाराचे रान उठवत आहेत. जत पूर्व भागात गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारास मोठा प्रतिसाद असून जत तालुक्यातून मोठे मताधिक्य पडळकर यांना मिळणार असल्याचेही बंडगर यांनी सांगितले.
जत पुर्व भागातील वचिंत आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ रैली