जत | वाळू तस्करांच्या दंडाच्या रक्कमेवरही महसूल कर्मचाऱ्याचा डल्ला |

0
1

तब्बल साडेबावीस लाख हडप : कारवाईची मागणी

जत,प्रतिनिधी : पकडलेल्या अवैध वाळू गाड्याच्या दंडाच्या रक्कमेची बोगस चलने तयार करून जत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी 22 लाखाच्या सरकारी रक्कमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास संबधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन किरण जोत्याप्पा बेंळुखी,नागेश चंदर पांढरे,संतोष शंकर पांढरे,दादासाहेब नामदेव हिप्परकर,अरूण शंकर बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जत तालुक्यात बेसुमार वाळू तस्करीने याअगोदर महसूल विभाग बदनाम झाला आहे. कारवाई शुन्यनने दररोज पन्नासवर वाहने दिवसाढवळ्या वाळू तस्करी करून सार्वजनिक ठिकाणी ओततात.त्यातून महसूल विभागाच्या दृष्टीस पडलेल्या काही वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाते.मात्र आता अशी कारवाईही फार्स झाला असून दंड म्हणून शासनाकडे जमा करण्याच्या रक्कमेवर गौणखनीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार करत तब्बल 22 लाख 50 हाजाराची रक्कम शासनाकडे जमा न करता हडप केली आहे.या प्रकाराने पुन्हा महसूल विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आमच्या मालकीची पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडत दडांत्मक कारवाई केली होती.गौण खनिज वाहतूक केली म्हणून वाहने जप्त करत जत तहसील व संख अप्पर तहसील कार्यालयासमोर वाहने लावली होती.कारणे दाखवा नोटिसा दिल्या होत्या.दंडाची रक्कम करण्यासाठी जत तहसील कार्यालयातील लिपिक लक्ष्मण भंवर व संखचा लिपिक बागल यांच्याशी संपर्क साधला.त्यांनी पैसे भरायवयाचे चलन तयार करून दिले.त्याच वेळी प्रांत कार्यालयातील लिपिक बीपीन मुंगळीकर यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर भंवर यांनी रुषीकेश तानगे उर्फ दत्ता मोरे यांना आमच्याकडे पाठवून देत लवकरात लवकर वाहने सोडविण्याचा निरोप दिला.त्यांच्यासाठी जादा रक्कम दिली. तसेच चलन व दंडाची रक्कम मुगळीकर यांना दिली.कवटेमहाकांळ येथून नोटरी सक्षम बंधपत्र तयार करून आणण्यास सांगितले.ते आणून दिल्यानंतर  रक्कम भरलेले चलन भरून उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश दिला.अरूण बिराजदार हे वाहने आणण्यासाठी संखला गेले.तेथे महसूल विभागाच्या खात्यावर रक्कम जमा नसल्याचे दिसून आले.त्यानंतर चौकशी केली असता मुंगळीकर व भवर यांनी बोगस चलन करून त्यावर बँकेचा बोगस शिक्का मारून दिल्याचे स्पष्ट झाले.दंडाची 22 लाख 50 हाजाराची रक्कम शासनाकडे जमा न करता परस्पर हडप केली आहे.या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात शेवटी केली आहे.

22 लाखच नव्हे अनेक लाखाचा गैरप्रकार ?
जत महसूल विभागाचा
गौण खनिज विभाग कायम चर्चेत असतो.दररोज लाखो रुपयाची वाळू तस्करी त्यांना अनावधाने दिसते.आतातर शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार समोर आला आहे.नुसते 22 लाख नव्हे तर गेल्या अनेक वर्षात कित्येक लाखाचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.यात खालपासून वरच्या अधिकाऱ्यांपर्यत मिलावट असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

मोठ्या तस्करांना या प्रशासकीय यंत्रणेचे बंळ 
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. अनेक राजकीय लोकही या वाळू तस्करीत गुंतले आहेत.त्यांच्याकडून दररोज लाखो रूपयाचा शासकीय महसूल बुडवून अनेक गाड्याची वाहतूक दिवसाढवळ्या केली जात आहे.त्यांना या महसूल विभागाचे अभय आहे.दुसरीकडे छोटे तस्कर कायम या गौण खनिज पथकाच्या रडारवर असतात.त्यांच्यावर सतत कारवाई होते.संख,उमदी,शेगाव,डफळापूर मंडल विभागातील अनेक अधिकारी,तलाठी व चतुर्थ कर्मचाऱ्यांचा वाळू तस्करांशी अर्थपुर्ण सहयोग जगजाहीर आहे.या परिसरातील गावात दिवसाढवळ्या थेट मुख्य रस्त्याच्या कडेलाही वाळूचे ढिग ओतले जात आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here