जत | मध्यमवर्गीय,व्यवसायिकांना अर्थपुरवठा करण्यासाठी पतसंस्थाच सक्षम पर्याय : डॉ.रविंद्र आरळी |

0

जत (प्रतिनिधी):मध्यमवर्गीय व मोठया व्यवसायिकांना अर्थपुरवठा करण्यासाठी पतसंस्थाच सक्षम पर्याय आहे. सहकारी संस्थेचे दररोज एक नियम बदलत असून यात बँका व पतसंस्था भरडल्या जात आहेत. त्यामुळे सहकारी संस्था काढून ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जत येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांनी जत येथे केले.जत येथील पत्रकार नगर येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या श्री.बालाजी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जत या पतसंस्थेचा शुभारंभ डॉ.रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी डॉ. भरत हेशी, प्रभाकर जाधव, दिनकर पतंगे, वीज मंडळाचे पी. आय. राठोड, एकुंडी सरपंच बसवराज पाटील, डॉ. राजेश सकटे, जनार्दन वाघमारे, चंद्रकांत गुड्डोडगी,मोहन मानेपाटील,राजाराम ऐवळे, बाबुराव नाईक,भीमराव राठोड, विनीत राठोड, करण राठोड, सुरेश चव्हाण, मधुकर चव्हाण, सौ. मंगल दुधाळ, सौ. सुजाता चव्हाण,गुरुशांत माळी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.आरळी म्हणाले की, बालाजी संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष विजय नाईक हे पहिल्यांदा महिलांसाठी बँक काढण्याचे ठरवले होते. मात्र सहकारी संस्थेच्या क्लिष्ट नियमामुळे त्यांना बँक काढता आली नाही. अखेर त्यांनी फार कमी वेळात संस्थेची स्थापना केली आहे. नाईक हे आमच्या धनलक्ष्मी पतसंस्थेचे ही संचालक आहेत. सभासदांच्या शेअर्स रक्कम व ठेवीवरच पतसंस्था टिकली जाते. या संस्थेने ठेवीवर भर द्यावा, असे आवाहन संचालक मंडळास केले. स्वागत व प्रास्ताविकात श्री.बालाजी संस्थेचे अध्यक्ष विजय नाईक म्हणाले की, या संस्थेचा कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. कमी वेळेत व कमीतकमी कागदपत्रे घेऊन कर्ज उपलब्ध केले जाईल,याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.सूत्रसंचालन कृष्णा संकपाळ यांनी केले. 

Rate Card

जत येथील श्री.बालाजी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जत या पतसंस्थेचा शुभारंभ बोलताना डॉ.रवींद्र आरळी व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.