जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वज्रवाड येथील अक्षरा सध्दिया मठपती या 9 वर्षीय मुलीचे अपहरण करून विहिरीत मृतदेह टाकल्याचा प्रकार 9 मार्चला उघडीस आला होता.त्याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.त्याला तब्बल 15 दिवस झाले.मात्र अद्यापर्यत आरोपीचा शोध लागलेला नाही.त्यामुळे अक्षाराच्या मुत्यूचे गुढ 15 दिवसानंतरही कायम आहे. जत पोलीस,स्थानिक गुन्हे पथक,सायबर क्राईमचे अधिकारी तपास करत आहेत.मात्र अद्यापर्यत या प्रकरणाचा तपास लागला नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.काही नाजूक संबधाचीही चर्चा सुरू आहे.पोलीस कसोशीने तपास करत आहेत. मात्र व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने नेमके कारण स्पष्ट होत नाही.