भिवर्गी | 10 एकरावरील ऊस जळून खाक | विज कंपनीच्या ठिनग्या पडून लागली आग |

0

 10 लाखाचे नुकसान

जत,प्रतिनिधी : भिवर्गी ता.जत येथील तलावानजिकच्या दहा एकरवरील ऊस विजेच्या ठिनग्या उडून आग जळून खाक झाला.त्यात सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Rate Card

भिवर्गी तलावानजिक मादाना आण्णाप्पा पुजारी यांचा 4 एकर,पंडित अमंणा पुजारी यांचा 4 एकर,महासिध्द अमगोंड खंटे 2 एकर अशा तीन शेतकऱ्यांच्या लगत असणाऱ्या विज वितरण कंपनीच्या टिसीमधून ठिनग्या पडून ऊसाला आग लागली.बघता बघचा 10 एकरवरील ऊस जळण झाला. ऊसाला पाणी देण्यासाठी टाकलेली मोटारीची केबल, ठिंबक सिंचनाच्या व इतर पाईप्स,लगतची फळझाडे,कडब्याची बलीम आदी आगीत जळून खाक झाले.त्यात सुमारे 10 लाख रूपयाचे नुकसान झाले.घटना शनिवारी दुपारी घडली.संध्याकाळ पर्यत चोफेर लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र तोपर्यत ऊस जळून खाक झाला होता.घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ठरल्याप्रमाणे महसूल विभागाकडून मोठा विलंब झाला.तर पंचनाम्याची माहिती मागणाऱ्या पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करून आपले पाप झाकण्याचे प्रयत्न झाला.दरम्यान ऐन दुष्काळात पोटाला पिळ देऊन जगविलेला ऊस डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

भिवर्गी ता.जत येथे महावितरणच्या डिपीच्या ठिनग्या पडून लागलेल्या आगीत 10 एकरावरील ऊस जळून खाक झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.