जत | डॉ.रवींद्र आरळी यांच्या राजकीय गटास नव्याने उभारी |

0

Rate Card


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांचा गट राजकीय पटलावरील मजबूतीकडे चालला आहे.भाजपला खऱ्या अर्थाने गेल्या 20 वर्षापासून जींवत ठेवण्याचं काम डॉ.आरळीसह ज्येष्ठ नेत्याने केले आहे.आतापर्यंत सत्तेसाठी अनेक नेते भाजपात आले, मात्र भाजपला उभारी देण्याचे काम डॉ.आरळी व त्यांच्या टीमने केलेले आहे.त्यात त्यांना आता मोठ्या प्रमाणात यश येताना दिसत आहे.डॉ.आरळी निवडणूक लढवू शकत नाही.याला फाटा देत डॉ.आरळी यांनी नगरपालिका निवडणूकीत लढून ताकत दाखविली आहे.पालिका निवडणूकीत थोडा दगाफटका झाल्याने त्याचा काटावर पराभव झाला.मात्र त्या निवडणूकीनंतर डॉ.आरळी यांचा गट मजबूत झाला आहे.आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी राजकारण केले आहे.ते तालुक्यात वेगळ्या माध्यमातून समाजकार्य करीत आहेत.त्यांनी आरळी अशी एक स्वतंत्र प्रतिमा तयार केली आहे.ती आता जनतेला हवीशी वाटू लागली आहे.जत तालुक्यातील डॉ.आरळींना भेटल्याशिवाय भाजप पूर्ण होऊ शकत नाही.गेल्या अनेक दिवसांपासून डॉ.आरळी यांचा स्वतंत्र गट तालुक्यात काम करत आहे.नगरपालिका निवडणुकीनंतर थेट सत्ताधारी भाजप आमदाराचे विरोधात आक्रमक झाला आहे. मंगळवारी झालेल्या जतेतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित समातंर कार्यकर्ता मेळाव्यात या गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखवलेली ताकत भविष्यातील राजकारणाचे मोठे पडसाद दर्शवणारी ठरली.भाजपातून जत विधानसभेसाठी डॉ.रवींद्र आरोळी आमदारीकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी काम सुरू केले.त्यात त्यांना जवळपास मोठ्या प्रमाणात यश येताना चित्र आहे.पुढील सहा महिन्यात असाच टेम्पो राहिल्यास डॉ.रवींद्र आरळी विधानसभेचे प्रमुख दावेदार असतील एवढे निश्चित..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.