वळसंग,वार्ताहर : दुष्काळी म्हणून ठप्पा पडलेल्या जत तालुक्यातील वळसंग येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेले आठवड्यात सतत चोऱ्याच्या घटना घडत आहेत.ट्रॅक्टर ट्रॉली, तर ग्रामपंचायत मालकीच्या सौर दिव्याच्या बॅटरी लंपास केल्या आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गावभागातील दुकानदार आणि लहान मोठ्या उद्योग धंदे करणाऱ्या व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. चोर रात्रीच्या वेळी पाळत ठेऊन चोरी करत आहे. हे भुरटे चोर गावातील किंवा गावभागातील असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.पोलीसांनी लक्ष घालून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
Home Uncategorized वळसंगमध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ | ट्रॅक्टर ट्रॉली,सौर दिव्यांच्या बॅटऱ्या होताहेत लंपास