येळवी,वार्ताहर : भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या वतीने दुष्काळी जत तालुक्यात 250 सिंटेक्स पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यत 135 टाक्या जत पूर्व भागात वाटप करण्यात आल्या आहेत.
तालुक्यात सध्या गंभीप परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून पाणी साठवणूक करता यावी यासाठी या टाक्या वाटपात मठाधिपती तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय संख येथे मोफत चारा छावणी सुरु केली आहे.पूर्व भागातील 42 गावासाठी पाण्यासाठी लढा उभारला आहे. लोकसहभागातून म्हैसाळ कालव्याचे काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.पाणी परिषदेमध्ये त्यांनी तशी घोषणाही केली आहे.तालुक्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्या गावात,वाडी वस्तीवर पाण्याची टाकी वाटपाचे नियोजन तुकाराम महाराज यांनी आखले आहे.तालुक्यातील टोणेवाडी येथे पाण्याच्या टाकीचे वाटप करताना तुकाराम महाराज यांनी दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
टोणेवाडी येथे पाण्याच्या टाकीचे वाटप करताना तुकाराम महाराज व मान्यवर