एकाचा कान तुटला,हल्लेखोर तिघे ताब्यात
डफळापूर,वार्ताहर : येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना रवीवारी सायकांळी घडली.संजय बालकृष्ण माळी व संग्राम संजय माळी असे जखमी बापलेकाची नावे आहेत.याप्रकरणी बाजीराव गोविंद शिंदे,आण्णाप्पा बाजीराव शिंदे, सचिन बाजीराव शिंदे (सर्व,रा.डफळापूर)यांना रात्री उशीराने जत पोलीसांनी ताब्यात घेतले.याबाबतचा जत पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
अधिक माहिती अशी, संजय माळी व बाजीराव शिंदे यांची एकमेकांना लागून जमीन आहे. जमीनीतील हद्दीचा त्यांच्यात अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. रविवार सायकांळी संजय माळी यांनी गट नं.280/2 या त्यांच्या मालकीचे शेत नांगरण्यासाठी ट्रक्टर लावला होता.हद्दीलगत नांगरत असताना हद्दीच्या बाजीराव शिंदे,व त्यांची मुले आण्णाप्पा,सचिन यांनी त्यास विरोध केल्या.त्यामुळे वादावादीला सुरूवात झाली.संजय माळी व संग्राम माळी यांच्यावर शिंदे व त्यांच्या मुलांनी कोयता,काठीने हल्ला केला.त्यात संग्राम माळी यांला कोयत्याचा वार लागल्याने कान तुटला.तर संजय माळी यांनाही मारहाणीत गंभीर दुखापत झाली.त्यांनी मिरज येथे उपचार करून जत पोलीसात सोमवारी फिर्याद दिली.याप्रकरणी बाजीराव शिंदे व त्यांच्या दोन्ही मुलाविरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या अतर्गंत गुन्हा दाखल झाला आहे.रात्री उशीरानी त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक सचिन गढवे करत आहेत.