जत,प्रतिनिधी : मायथळ कालव्यांमधून व्हसपेठ तलावात पाणी येण्यासाठी दोन किलोमीटरच्या कँनॉलचे काम करण्याची गरज आहे.जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला सरकारने देऊन आम्हास लोकसहभागातून काम करण्यास परवानगी द्यावी.दोन महिन्यात कँनॉल पुर्ण करू,अशी ग्वाही पाणी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक ह. भ.प.तुकाराम महाराज यांनी सरकारला दिली.
जत तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावांचा समावेश करावा यासाठी भव्य शेतकरी मेळावा पाणी परिषद माडग्याळ येथे संपन्न झाली.
देश स्वतंत्र झाल्यापासून जत पूर्व भागातील 42 गावांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी देण्यासाठी अद्यापर्यत शासनाने ठोस पावले उचलली नाहीत.त्यामुळे आता पाणी आणण्यासाठी आर या पारची लढाई आम्ही पुकारली आहे.त्यासाठी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. जत पुर्व भागातील सिंचनासह येथील परिसराचा कायापालट करायचा आहे.त्यासाठी मी यापुढे पुढाकार घेणार आहे.दरवर्षी येथे पाणीपरिषदचे आयोजन करून वर्षभरात केलेल्या कामाची माहिती या परिषदेत दिली जाईल.राजकारणी मंडळीने फक्त राजकारण केले पण ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.येत्या दोन महिन्यात सरकारने उमदी,सोन्याळ,व माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर असा म्हैसाळ योजनेचा कँनॉल काढावा यासाठी आम्ही पाटबंधारे विभाग संबधित अधिकाऱ्यांना भेटून माहिती दिली आहे. त्यासंदर्भातील सर्व्हेही करण्यात आला आहे. माडग्याळ पासून सोन्याळ, उटगी, उमदी,तर व्हसपेठ गुड्डापूर पासून संख व त्यापुढच्या गावांना म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी देणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा.ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे दुर्लक्षित राहिलो.यापुढे अन्याय सहन करायचा नाही.नाहीतर पुढील पिठी माफ करणार नाही.
मायथळ ते व्हसपेठ या दोन किलोमीटर अंतराचा लोकसहभागातून निधी उभारून कँनॉल काढण्याचे अधिकार आम्हाला द्यावे,दोन महिन्यात या भागात म्हैसाळचे पाणी आणू असा विश्वास तुकाराम महाराज यांनी व्यक्त केला.यावेळी विक्रम सावंत म्हणाले, यापुढील पाण्याची लढाई ही तुकाराम महाराज यांचे मार्गदर्शनाखाली उभा करावी,आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत.
अमृतानंद स्वामीजी बोलताना म्हणाले,आता सरकारची वाट न पहाता तुकाराम महाराज यांनी घेतलेली भूमिका योग्य असून त्यांना सर्वानी सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. यावेळी आप्पाराया बिराजदार्बाबासाहेब कोडग,एकनाथ बडगर,एस.एस.वाली, तम्म्ण्णागौडा रविपाटील,संजय धुमाळ,दत्ता सावळे,अंबाण्णा माळी,शंशिकात माळी,महादेव माळी,जेटलिंग कोरे,गुरूकाका माळी,व्हनाप्पा माळी,पांडूरंग माळी,अशोक माळी,लिंबाजी माळी,कामाण्णा बंड्गर,श्रीशैल कोरे,मारुती पैलवान,विजय वाघमरे,दशरथ सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत या घोषणा करण्यात आल्या• जत पूर्व भागातील 42 गावासाठी शेतीसाठी व पिण्याचे पाण्याची योजना राबवावी • सरकारने येत्या 15 दिवसात 42 गावातील पाण्याचा ठोस निर्णय न झालेस येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा• जत तालुक्यात दुष्काळाच्या सवलती मिळाव्यात.• दुष्काळी जत तालुक्यासाठी राज्य शासनाने विशेष पँकेज जाहीर करावे.• माडग्याळ येथे जाहीर झालेले शेळी मेंढी पैदास केंद्र लवकर सुरू करावे.• सुशिक्षित बेकारी हटविण्यासाठी माडग्याळ येथे एमआयडीसी उभारावी.
माडग्याळ ता.जत येथे पाणी परिषदेत बोलताना तुकाराम महाराज, उपस्थित शेतकरी