जत | भाजपा विजय संकल्प रँलीला जतेत तूफान प्रतिसाद | आमदार गट तटस्थ |

0
1

जत,प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या महत्वाचे अभियान असलेले विजय संकल्प बाईक रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झा ली. जत शहरातून निघालेल्या रँलीत सुमारे पाचशे दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. यात भाजपचे जेष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी,सह प्रमुख नेते सहभागी झाले होते. शहरातील शिवाजी पुतळा, येथून निलेली रॅली शिवाजी चौकापासून संभाजी चौक, सोनलकर चौक, निगडी कॉर्नर, विठ्ठल नगर,आरळी कॉर्नर,महाराणाप्रताप चौक, बस स्टॅन्ड, मार्केट यार्ड, बसवेश्वर चौक, समता चौ,बंनाळी चौक,जत वाचनालय छत्रीबाग रोड,जुना राजवाडा चौक, बाजारपेठ रोड,बिंळूर रोड मार्गवरून निघाली.भाजप अंतर्गत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विधानसभा निहान या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.लोकसभा निवडणूक 2019 निवडणूकीत भाजप सरकारचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी अशा पद्धतीने वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात झालेल्या या रॅलीत उमदी, संख, दरीबडची,मुचंडी बनाळी,शेगाव,डफळापुर जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी सामील झाले होते.

रँलीत आमदार जगताप गट तटस्थ

जत शहरात निघालेली रँलीत आ.विलासराव जगताप व त्याच्या गटाचे तालुका व शहरातील पदाधिकारी सामील झाले नाहीत.त्यामुळे वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते.भाजपकडून पुढील आमदारकीसाठी उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झालेले डॉ.रवींद्र आरळी यांनी आमदार गटाशिवाय काढलेल्या रँलीला मिळालेला प्रतिसाद भविष्यात अनेक गणिते अधोलिखित करणारा ठरला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here