सांगली | म्हैशाळ प्रकल्पांतर्गत देवनाळ,बिंळूर कालव्यावरील कार्यक्षेत्रात कलम 144(1) लागू |

0

सांगली : जिल्हादंडाधिकारी, सांगली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारास अधिन राहून सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ प्रकल्पांतर्गत टप्पा क्र. 6-अ व 6- देवनाळ कालवा भाग-1 व भाग-2 कालव्यावरील कार्यक्षेत्रातील बाज, बेळुंखी, डफळापूर, अंकले, खलाटी, येळदरी ही गावे तसेच बिळूर कालवा भाग-1 व भाग-2 वरील डोर्ली, अंकले, बाज, बेळुंखी, डफळापूर या कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून दोन्ही बाजूस 200 मीटर अंतरावर दिनांक 21 फेब्रुवारी 2019 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 5 मार्च 2019 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) लागू केले आहे.या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.