जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे 18 वर्षापासून जतेत तळ ठोकला ज्यू. इंजिनीयर यांच्या भ्रष्ट कामाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आरपीआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,जत पंचायत समितीचे जूनियर इंजीनियर शेख हे जत तालुक्यातील 75 गावचे कामकाज बघतात. त्यांच्याकडे दलितवस्ती सुधार योजनाची कामे सुरू अाहे. यात पेव्हींग ब्लॉक,गटारी,रस्ते सभागृह इत्यादी कामाचे देखरेख व मोजमाप
करण्याचे काम शेख यांच्याकडे आहे. या कामत बोगस मोजमाप करून शासनाकडून जादा बिले काढण्याचे प्रकार झाले आहेत.पुढेही होत आहेत. शासनाची थेट फसवणूक करून दलित समाजाचा निधी हडपण्याचा शेख हे अनेक दिवसापासून हा प्रकार करत आहेत. त्यांच्या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,त्यांची बदली करावी यासाठी मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून जत आरपीआयच्या वतीने मोर्चे,आंदोलने,उपोषण धरणे आंदोलन करत तीव्र लढा दिला आहे.तरीही शेख यांची साधी चौकशी होत नाही, ही बाब गंभीर आहे.असे यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितले.अभिंयता शेख यांना बदली झालेल्या तासगाव पंचायत समितीला पाठवावे व शेख यांनी केलेल्या सर्व कामाची खातेनिहाय चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. जत पंचायत समितीच्या भ्रष्ट अंभियत्यावर फौजदारी कारवाई करा या मागणीचे आरपीआयच्या वतीने जि.प.चे मुख्य.कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.x