जत | चोरलेला ट्रँक्टर विक्री करताना 3 चोरटे जेरबंद,जत पोलीसाची डफळापूर येथे कामगिरी : मुंचडी येथून चोरला होता टँक्टर

0

जत,प्रतिनिधी : मुचंडी(ता.जत) येथून दादासो बाबुराव चव्हाण (रा.जालीहाळ यांचा)कलर कामासाठी गँरेजसमोर लावलेला महिंद्रा कंपनींचा संरपच मॉडेल टॅक्टर 27 ऑगस्ट 2018 ला चोरीला गेला होता.याप्रकरणी जत पोलिसांनी कसून तपास करून अखेर तो टँक्टर संशयित तीन चोरटे डफळापूर येथे विक्रीसाठी आले असताना त्यांना जत पोलीसाच्या पथकाने टँक्टरसह रंगेहाथ पकडले.याप्रकरणी निहाल उर्फ हाजीमस्तान आयुब खाटीक,(वय-22,रा.धुळगाव रोड कवठेमंकाळ),राहुल अण्णाप्पा कोरे (वय-31,रा. विठूरायाचीवाडी(कवटेमहांकाळ) व अल्पवयीन एक अशा तिघा संशयिताना पोलीसांनी ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी की,जालीहाळ येथील दादासो चव्हाण हे त्यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक केए- 28/ 5681,ट्रॉली क्रमांक-28,टीए- 8734 हा कलर पेंटिंग करण्यासाठी मुचंडी येथील गँरेज समोरील मोकळ्या जागेत लावला होता.तो टँक्टर ट्रॉलीसह 27 ऑगस्ट 2018 रोजी चोरीस गेला होता. याबाबत जत पोलिसात नोंद करण्यात आली होता. दरम्यान पोलीस उपनिरिक्षक रणजीत गुंडरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता.त्यांनी पथकासह गेले तीन महिने कसून तपास केला. त्यात रविवारी हा ट्रॅक्टर तीन चोरटे डफळापूर येथे विक्रीसाठी आणणार असल्याची खबर्‍याकडून माहिती मिळाली होती, त्यानुसार पथकाने सापळा लावला.डफळापूर गावच्या पश्चिम बाजूच्या अनंतपुर रोडला संशयित चोरटे उर्फ निहाल उर्फ हाजीमस्तान आयुब खाटीक, राहुल अण्णाप्पा कोरे व अल्पवयीन एक असे तिघेजण चोरीतला महिंद्रा कंपनीचा 575- डीआय ट्रॅक्टर विक्री करत होते.त्या दरम्यान छापा पथकाने टाकून संशयित चोरट्यासह ट्रॅक्टर,ट्रॉली ताब्यात घेतली. ट्रॅक्टर-ट्रॉलीसह चार लाखाचा मुद्देमाल पथकाला मिळून आला.संशयित आरोपींना विचारणा केली असता त्यांनी ते टँक्टर ट्रॉली मुंचडी येथून चोरून आणल्‍याचे कबूल केले असल्याचे तपासधिकारी रणजित गुंडरे यांनी सांगितले. त्यांना न्यायालयात उभे केले असता 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डीवायएसपी अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंडरे,कॉन्टेबल केरबा चव्हाण, संदीप नलावडे,प्रशांत गुरव,सतीश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Rate Card

जत चोरलेला ट्रँक्टर विक्री करताना पकडलेल्या संशयित अरोपी व टँक्टरसह डिवायएसपी अनिकेत भारती, तपासअधिकारी रणजीत गुंडरे 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.