इस्लामपूर | जयंत नोकरी मेळाव्यास तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद,1013 युवकांची निवड |

0

Rate Card

इस्लामपूर, प्रतिनिधी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जयंत नोकरी मेळाव्यास वाळवा तालुक्या तील तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यातून तालुक्यातील 1013 युवकांची निवड करण्यात आली. युवा नेते प्रतिकदादा पाटील,राजवर्धनभैय्या पाटील यांच्या हस्ते निवड झालेल्या युवकांना निवड पत्रे देवून नव्या करिअरला शुभेच्छा देण्यात आल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जयंत करिअर गाईडन्सने आयोजित केलेला हा मेळावा इस्लामपूर येथील मा.जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्याच्या गावा-गावातून 2 हजार 337 युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग घेतला. सांगली,सातारा, कोल्हापूर व पुणे येथील 37 नामवंत कंपन्यांनी या मुलांच्या मुलाखती घेवून निवड झालेल्या मुलांना निवड पत्रे दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याचे उदघाटन झाले. त्यांनी राजारामबापू समूहामध्ये आपण मोठ्या प्रमाणात रोजगार दिला. मात्र आपणास काही मर्यादा आहेत. आपण गांव,घर  सोडण्याची मानसिकता ठेवा. आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर मिळेल त्या संधीचे सोने करा,असे आवाहन त्यांनी केली. यावेळी त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.राजवर्धन पाटील,प्रतिकदादा पाटील हे सकाळपासून मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, मुलाखती साठी आलेल्या मुलांच्याबरोबर संवाद केला,त्यांना सहकार्य केले,व प्रोत्साहन दिले. राजवर्धन पाटील यांनी उदघाटन समारंभातील भाषणात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशस्वी झालेल्या व्यावसायिकांची उदाहरणे देत कष्ट हे यशस्वी जीवनाचा पाया असल्याचे सांगितले.हा मेळावा यशस्वी करण्यात पी.आर.पाटील,प्रा.शामराव पाटील, विनायक पाटील,आर.डी.सावंत, विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,संग्राम पाटील,सुस्मिता जाधव,प्राचार्य राजेंद्र कुरळपकर,एस.डी. यादव (सर), विशाल पाटील,कु.प्रज्ञा पाटील, प्रा.रणजित पाटील,प्रा.संदीप माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.