जत | पूर्व भागातील एका आश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार,गर्भपात,निनावी पत्राध्दारे समाजकल्याण विभागाकडे तक्रार |

0
Rate Card


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पूर्व भागातील एका आश्रमशाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनीवर त्याच शाळेतील शिक्षकांकडून बलात्कार करून गर्भपात केल्याचा प्रकार झाला असल्याची चर्चा तालुकाभर दबक्या आवाजात सुरु आहे.राजकीय दबावाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.यां प्रकरणाचा सखोल चौकशी अशी मागणी होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्याच्या पूर्व भागातील एका आश्रम शाळेत निवासी विद्यार्थी व विद्यार्थीनीची शिक्षण व राहण्याची सोय आहे.त्या शाळेत सातवीत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीबरोबर त्याच शाळेतील शिक्षकाने लग्नाचे अमिष दाखवून तीन महिने बलात्कार केला जात होता.या कृत्यास अजून एका शिक्षकाचा हात होता.गरीब परिस्थीतीने हतबल झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर झालेल्या हा अत्याचार तिने निमुटपणे सहन केला.नराधम संशयित शिक्षकाने या कृत्याचा व्हिडिओ क्लिप तयार करुन ठेवल्या होत्या, असे समाजकल्याण विभागाला पाठविलेल्या  निवेदनात हे नमुद करण्यात आले आहे.याची वाच्याता बाहेर केल्यास जिवे मारण्याची व व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी संबंधित शिक्षकांनी पिडित विद्यार्थींनीला दिली होती.या प्रकारणाची गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु आहे.या शिक्षकाने पडित मुलगी शाळेस  दिवाळी नंतर आलीच नाही. हे कारण दाखवून संबंधिताकडून तिचे नाव शाळेतून कमी केल्याची चर्चा आहे.या पडित मुलीच्या असह्यता व गरीबीचा फायदा या शिक्षकांने उचलेला आहे.हा प्रकार मुलीच्या घरी समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दहा हजार व मिटविण्यासाठी पन्नास हजार देवून हे प्रकरण दाबले असल्याचे निनावी पत्रात म्हटले आहे.

संबधित शाळेची सखोल चौकशी करण्याची मागणी सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य उजेडात येईल.संबधित शिक्षक संस्थेवरती कारवाई करण्याची मागणी हेत आहे.

 

तक्रार पेट्या व सीसीटिव्ही बसवावेतजत तालुक्यातील आश्रमशाळेत अशा घटना वारंवार घडत तक्रारी घडत आहेत.परंतु राजकीय,आर्थिक दबाबखाली अशी प्रकरणे दाबून ठेवली जात आहेत.अशा घटना टाळण्यासाठी आश्रमशाळा,निवाशी वसतीगृहात मुलीकरिता स्वंतत्र तक्रार पेट्या व सीसीटीव्ही बसविण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.