जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाच्छापूर येथील जनावरांना लाळ-खुरकत आजाराने वेढले होते.अनेक जनावरे मृत्त झाल्यानंतर जिल्हा पशूधन विभाग खडबडून जागा झाला.पशुधनच्या जिल्हा समितीने शनिवारी दिवसभर पाच्छापूर मधील जनावरांची तपासणी केली.त्यांच्या लाळ,जखमा, रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. जिल्हा कृषी अधिकारी डॉ.विजय सावंत यांचे पथक पाच्छापूर मध्ये शनिवारी दाखल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले.मृत्त जनावरांचे लेखी पत्र द्यावे.त्यानुसार फक्त नऊ शेतकऱ्यांनी जनावरे दगावल्याचे लेखी पत्रे पथकाकडे दिली आहेत.त्यात लहान जनावरांचा समावेश आहे. असे तालुका कृषी अधिकारी डॉ.सदाकळे यांनी सांगितले. पाच्छापूर येथे लाळ-खुरकत सदृष्य आजाराची भीषण साथ आली होती. बरीच जनावरे दगावली आहेत. जनावराच्या तोंडातून लाळ येणे,पायांना जखमा होणे,त्यात जनावरांचा मृत्यु होण्याच्या प्रकारांनी शेतकरी भयभीत झाले होते. जनावरांचे दगावण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी पशुधन विभागाच्या वरिष्ठ विभागाने तपासणी करावी असे आव्हान केले होते.त्यानुसार डॉ. विजय सावंत यांच्या टीमने या परिसरातील जनावरांची तपासणी केली त्यात काही जनावरांना तशी लक्षणे आढळल्याने,त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.आजाराची लागण झालेल्या जनावरांची लाळ, रक्त,जखमांची नमुने घेण्यात आले आहेत. जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांची लेखी अर्ज घेण्यात आले. शनिवारी दिवसभरात अशा नऊ शेतकऱ्यांनी अर्ज दिले आहेत.बाकी शेतकऱ्यांना अर्ज देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.शासनाला तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.