जत | पुर्व भागातील प्रांरभी 25 गावांना महिन्याभरात कर्नाटकातून पाणी ? |

0

दोन्ही राज्यातून प्रांरभी प्रवाहाने पाणी देण्याला प्राथमिकता दिल्याचे वृत्त 

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावचा पाणीप्रश्न महत्वपुर्ण ठरला आहे.सततच्या दुष्काळाने परिसरात पाणीटंचाईने नागरिकांचे दैना झाली आहे.त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाणी देणे गरजेचे आहे.म्हैशाळ तसेच टेंबू सारख्या योजनेतून पाणी देण्यासाठी काम करणारे खा.संजयकाका पाटील व आ. विलासराव जगताप हे कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सिमेपर्यत आलेल्या सिंचन योजनेतून पुर्व भागातील 42 गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही राज्यांनी त्याच्या प्रयत्नाला यश येत आहे. सध्या कर्नाटकातील सिमेलगतच्या गावातून नैसर्गिक प्रवाहाने तालुक्यातील 25 गावांना प्रत्यक्षात महिनाभरात पाणी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.खा.पाटील व आ.जगताप यांनी प्रथमत: पाणी देणास प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे त्यात गती आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटकातील मुख्यमंत्री,जलसंपदामंत्री व अधिकारी यांच्या बैठकींना वेग आला आहे. महाराष्ट्र शासन कर्नाटकला कृष्णा नदीतून पाणी देत आहे.गतवर्षी व यंदाही या मार्गाने महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी दिले जात आहे.पुढेही अजून पाणी कर्नाटकला दिले जाण्याची शक्यता आहे. त्यातून सध्या दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्रातील जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावांना तातडीने पाणी देण्यासाठी दोन्ही राज्यातील यंत्रणा कमालीच्या सकारात्मक झाल्या आहेत.सिमेलगतचा कन्नड बाहूल भाग असल्याने दुष्काळी मदत म्हणून जत पूर्व भागातील नागरीकांना प्रत्यक्षात पाण्याची गरज आहे.असे कर्नाटक सरकारला पटवून सांगण्यात आले आहे.त्यामुळे प्राधान्याने कर्नाटकच्या सीमेवर आलेल्या कालव्यातून नैसर्गिक उताराने पाणी देणे शक्य आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना व दोन्ही राज्यातील अधिकारी कामाला लागले आहेत. खा.संजयकाका पाटील व आ.विलास जगताप यांनी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री संबंधित मंत्री यांना तातडीने पाणी देण्याची विनंती केली आहे.त्यादृष्टीने त्यांनी दोन्ही राज्यातील अधिकारी त्यांच्या बैठका लावले आहेत नव्याने योजना अकुन वेळ जाणार आहे सध्या पूर्व भागातील गावे पाणीटंचाईने होरपळत आहेत माणुसकी म्हणून कर्नाटक शासनाने त्या गावांना पाणी सोडणे सोडावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जत तालुक्यातील शेवटच्या गाव पांढरेवाडीपर्यंत पाणी पोहोचले आहे.तेथून पुढे वडापत्रातून प्रारंभी महाराष्ट्रातील 25 गावांना पाणी देणे शक्य आहे.महाराष्ट्र शासन यासाठी तयार असल्याचे चित्र आहे.शासनाचे करोडो रुपये भविष्यात दुष्काळी उपाययोजनासाठी लागणार आहेत. त्याऐवजी हे पाणी आल्यास त्यात मोठी बचत होईल.प्राथमिक स्थितीत सीमेवर आलेले पाणी कोणत्याही खर्चाविना जत तालुक्यातील सुमारे 25 गावांना येणे शक्य आहे.त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. खा.पाटील व आ.जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकारी यांना योजनेच्या उपअंगाची माहिती दिली आहे. कोणत्याही अडथळ्याविना माफक खर्चात जतच्या सिंचनापासून वंचित गावात पाणी देण्यात येणार आहे.कर्नाटक शासनाला या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.त्यांच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे.दोन्ही राज्याच्या समन्वयातून हे पाणी सध्याच्या स्थितीत जतला देणे शक्य आहे. शासनाकडून कर्नाटकला काही टीएमसी पाणी आताही दिले जाते,ते जतला पाणी दिल्यानंतर वाढवण्यात येणार आहे.तशा संबंधाने सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.त्यामुळे पूर्व भागातील प्रारंभी 25 गावांना आशा निर्माण झाली आहे. खुद्द खा.पाटील,आ.जगताप हे यासाठी प्रचंड सक्रिय होत प्रत्यक्षात पाणी आणण्याचा चंग बांधला आहे.सर्व भागातील माहिती त्यांनी शासनाला कळविले आहे.सध्या या भागात पाणी आल्यानंतर टँकर,व चारा उपाययोजनासाठी लागणारे शासनाचे कोट्यावधी रुपये वाचू शकतात. कर्नाटक सरकारकडून तयार असलेल्या योजनेतून जतच्या पूर्व भागातील शिवारात पाणी आणायचे आहे.बऱ्यापैंकी यंत्रणा यात काम करत आहे.जनतेकडून रेटा वाढला आहे याला मूर्त स्वरूप आले आहे.प्रत्यक्षात महिन्याभरात पाणी येणार असल्याची वृत्त आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.