जतच्या पाण्यासाठी 8 दिवसांत कर्नाटकसोबत बैठक
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,शिष्टमंडळास आश्वासन
जत,प्रतिनिधी;जत तालुक्याच्या पूर्व भागातील 42.गावांना कर्नाटकातून पाणी देण्याबाबत दोन्ही राज्याच्या जलसंपदा विभागांची येत्या आठ दिवसांत बैठक घेऊ असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जतच्या शिष्टमंडळास दिले.
कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून जत तालुक्याच्या पूर्वभागास पाणी सोडावे या मागणीसाठी तालुक्यातील एक शिष्टमंडळ मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व सार्वजनिक आरोग्य,राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांना भेटले.

शिष्टमंडळात भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र अारळी, सोमनिंग बोरामनीसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग होेता.
डॉ.अारळी यांनी मंत्री महाजन यांना सांगितले की,जत सीमावर्ती भाग अत्यंत दुष्काळी आहे. पूर्व भागातील 42 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देणे शक्य नाही.कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेतून नैसर्गिक उताराने या गांवाना पाणी देणे शक्य आहे.याबाबत अनेक वर्षांपासून मागणी आहे.कर्नाटक सरकारही पाणी देण्यास अनुकूल आहे.
जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, यापूर्वीच बैठक घेण्याचे ठेले होते.मात्र ती बैठक झाली नाही.येत्या आठ दिवसांत जत तालुक्यातच दोन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागाची बैठक घेऊ.जत तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक आहे.दोन्ही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांची बैठक जत तालुक्यातील गुड्डापूर येथे घेणार असल्याचे डॉ.अारळी यांनी सांगितले.
