डफळापूर,वार्ताहर : जत येथील प्रभाकर अण्णू कोळी यांना कै.बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार सन.2017-18 घोषित झाला आहे.जरवर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.बँक कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव त्यानिमित्ताने केला जातो.यावर्षी जत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी श्री.प्रभाकर कोळी यांना अधिकारी श्रेणीतून या पुरस्कारांसाठी निवडण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षापासून श्री.कोळी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.अनेक तोट्यातील शाखा त्यांनी शेतकरी,सोसायट्या,खातेदार व प्रशासन यांचात समन्वय साधून फायद्यात आणल्या आहेत.अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उत्कृष्ट आहे. त्यामुळे जत तालुक्यातून त्यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.लवकरच मुंबई येथे विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.





