संख,वार्ताहर :जत तालुक्याच्या पूर्व भागातील 42 गावांना म्हैसाळचे पाणी देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंञी विजय शिवतारे व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडेपाटील यांनी जत तालुक्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.जत तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे जलसंपदामंञी विजय शिवतारे व कृष्णाखोरे महामंङळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडेपाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी जिल्हाप्रमूख आनंदराव पवार.संजय विभूते,सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील. तालुका प्रमुख अंकूश हुवाळे,संपर्क प्रमुख तानाजी गुरव,रेणुका देवकते, अजय पाटील,तम्मा कुलाळ,अमित दुधाळ श्रीमंत कर्प,सिद्धू गायकवाड,हरीचंद्र कांबळे,भारत टेंगले,योगेश गायकवाड,नवनाथ दुधाळ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख अंकूश हुवाळे म्हणाले,जत तालुक्याच्या पुर्व भागातील 42 गावे ही म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत.या वंचित गावाला पाणी द्यावं यासंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून या तालुक्यांमध्ये म्हैसाळ कार्यालयाकडून सर्वेक्षणाचे काम चालू असून सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे.पंढरपूर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि.24 तारखेला पंढरपूरला येथे महामेळावा होणार अाहे. या मेळाव्यासाठी जत तालुक्यातून 100 गाड्यातून 1,हाजार नागरिक उपस्थित जाणार आहेत.शिवसेनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील नागरिकांनी पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मुंबई येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितिन भानुगडेपाटील़ यांना निवेदन जतचे शिष्टमंडळ