शिवप्रताप मल्टी-स्टेट जतेत सर्वाधिक व्यवसाय करेल : आ.विश्वजित कदम

0


जत,प्रतिनिधी :  विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचा जत शाखेचा उद्घाटन सोहळा आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते दिमाखात पार पडला.यावेळी कॉग्रेस नेते विक्रम सांवत, नगराध्यक्षा शुंभागी बनन्नेवर, नगरसेवक नाना शिंदे,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, संस्थेचे संस्थापक प्रतापशेठ साळुंखे,व्हा.चेअरमन हणमंतराव संकपाळ, माजी नगरसेवक भैय्या कुलकर्णी, मुन्ना पखाली,नगरसेवक नामदेव काळे,सुहास शिंदे,इंद्रजित साळुंके,दुर्योधन कोडक,सुभाष पाटील,श्री.कट्टरे सर,जत अर्बन बँकेचे संचालक धान्नाप्पा ऐनापुरे,मंजू मोगली,दिलीप सोलापूरे, बसवराज हिट्टी,चंदुलाल शेख,आप्पासो कोळी, संचालक भीमराव देवकर,सतीश साळुंखे, जयसिंगराव गायकवाड,विक्रम पाटील, सिताराम हारुगडे,आलम पटेल,बबनराव दबडे,
श्रीमती सुरेखा जाधव,रोहिणी जाधव,यशोधन कांबळे,रंणजितसिंह जाधव,शिवाजी माने, अशोक साळुंखे,धनाजी पाटील,किरण पाटील, मुरगाप्पा सगरे,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना आ.विश्वजित कदम म्हणाले, जत हे मोठे शहर आहे.येथील लोक काबाडकष्ट करून धैर्याने दुष्काळाला तोंड देतात.अशा हलाक्याच्या परिस्थितीत येथील व्यवसास टिकून आहेत. येथे बँकिंग सारख्या व्यवसायाला मोठा वाव आहे.शिवप्रताप संस्था एक विश्वासू संस्था आहे.जिल्हाभर संस्थेचा नावलौकिक आहे.सर्व अत्याधुनिक सुविधा संस्थेमार्फत जत तालुक्यातील जनतेला यापुढे कायम उपयोगी पडतील आहेत.पारदर्शी व जोगदळ कारभार यामुळे संस्था जत तालुक्यात अग्रक्रम मिळवेल. 100 कोटीकडे वाटचाल करणारे व सभासद हिताचा कारभार संस्थेचे भविष्य उज्वल करणार आहे.त्यामुळे जत तालुक्यातील जनतेनी या संस्थेत सहभाग नोंदवावा.
कॉग्रेस नेते विक्रम सावंत म्हणाले, संस्थेचे संस्थापक प्रतापदादा यांनी दुष्काळी असणाऱ्या व दुर्लक्षित शहरात शाखा काढून चांगली काम केले आहे.जतच़्या विकासासाठी संस्थेचा फायदा होईल.संस्थेचा जत शहरातील व्यापारी,उद्योजक,नागरिक लाभ घेतील.
माजी आ.उमाजीराव सनमडीकर म्हणाले, जतसारख्या शहरात मोठ्या संस्थांची गरज आहे.ती शिवप्रताप संस्थेने पुर्ण केली आहे.येथील बेरोजगार व्यवसाय तरुणांना संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळेल. त्याशिवाय अर्थपुरवठा,बचतठेव,ठेवी,लॉकर सुविधा यामुळे येथील नागरिकांची सोय झाली आहे.
प्रतापशेठ साळुंखे म्हणाले,सध्या सहकार व राष्ट्रीयकृत बँकांची परिस्थिती ढासळली आहे.बँकाचे एनपीए वाढले आहे.त्यामुळे त्याचा कर्जपुरवठ्याला ना आहे.त्यामुळे सामान्य लोकांची सध्या आर्थिती कुचबंना होत आहे.आमच्या संस्थेत गरजूंना कर्ज पुरवठा मिळणार आहे.ती फेडण्याचीही जबाबदारी त्यांना पेलायची आहे.सध्या आपल्या ठिकणे गरजेचे आहे.आम्ही जत शाखेत सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.पारदर्शी व स्वच्छ कारभारामुळे संस्थेचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढला आहे.तो निव्वळ सभासद आमचे खातेदार यांच्या पाठबंळावर आहे.त्या आम्ही प्राथमिकता देतो. त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीला आमची संस्था कायम हातभार लावेल. सोने तारण कमी व्याजदरात कर्ज पुरवठा यासह अन्य सुविधा आम्ही एकाच छताखाली उपलब्ध केल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा.
संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली, संस्था 100 कोटी ठेवीकडे वाटचाल करत आहे. आजमितीस 92 कोटी ठेवी,70 कोटी कर्ज वाटप, 27 कोटी गुंतवणूक व स्वंनिधी 7 कोटी इतका आहे.संस्थेत लाईट बिल,टेलिफोन बिल,आरटीजीएस/आयएमपीएस तसेच पॅन कार्ड,पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.संस्थेचे सुसज्ज लॉकर सुविधा महत्वपूर्ण आहे.संस्थेत सर्व विमा कंपन्यांचे विमा पॉलिसी,हप्ते भरण्याची सोय आहे. त्याशिवाय बचत,ठेवी,कर्ज पुरवठा व सहकार क्षेत्रातील अनेक सुविधा आमच्याकडे उपलब्धं आहेत. जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन साळुंखे यांनी केले.हणमंतराव पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील नागरी उपस्थित होते.


Rate Card


जत येथील शिवप्रताप मल्टी-स्टेट संस्थेच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना आ.विश्वजीत कदम,बाजूस माजी आ.उमाजीराव सनमडीकर,विक्रम सांवत,प्रतापशेठ सांळुखे आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.