गोंधळेवाडीतील चारा छावणीचे आण्णा हजारेच्या हस्ते उद्घाटन

0

संख,वार्ताहर : संकल्प दुष्काळाचे 158 दिवस निवारणाचा हा उपक्रम सेवाभावी वृतीतून हाती घेतलेल्या जत तालुक्यातील गोधळेवाडी येथील तुकारामबाबा महाराज यांनी चारा छावणी आणि मोफत पाण्याची टाकी वाटप   करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.या कार्यक्रमातील चारा छावणीच्या उद्घाटनास जेष्ठ समाजसेंवक अण्णा हजारे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. एक जानेवारीपासून आपण 158 दिवस दुष्काळग्रस्तांसाठी काम करणार असल्याची माहिती तुकाराम महाराज यांनी दिली.
जत तालुक्याच्या सामाजिक कार्यात नेहमी विशेष योगदान देणारे तुकाराम महाराज यंदाच्या दुष्काळावर जत तालुक्यात मोठे काम सुरू केले आहे.तालुक्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाने जनता वैतागून गेली आहे. एक तर जनावरांच्या पोटासाठी चारा मिळणार कोठून आणि पिण्यासाठी पाणी कुठून आणायचे असे अनेक प्रश्न येथील जनतेसमोर उभे राहिले आहेत.दुष्काळ जाहीर होऊनही सरकारी यंत्रणा गतीमान होत नाही. यांमुळे शेतकरी जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा अडचणीच्या काळात जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील सय्याजी बागडे बाबा महाराज चँरीटेबल ट्रस्ट अतंर्गत गेले अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवली जात आहेत.मोफत शौच्छालय,घरे,सामुहिक विवाह सोहळा,संस्था,मंडळांना धार्मिक कार्यासाठी आर्थिक मदत,असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. दुष्काळाच्या पाश्वभुमीवर तुकाराम महाराजांनी दुष्काळात जनतेबरोबर लढण्यास सज्ज झाले आहेत.राज्यभरात उद्योजक,साखर कारखानदार,सेवाभावी संस्था, सामाजीक कार्यकर्ते,भांडवलदार व बागडेबांचे भक्त यांना संपर्क साधून, जत तालुक्यासाठी 101 पाण्याच्या सिंटेक्स टाक्या उपलब्धं केल्या आहेत.याद्वारे गरीब लोकांना योग्य पद्धतीने पाणीसाठा करता यावा या मागचा उद्देश आहे.त्याशिवाय जनावरांना चाऱ्याची सोय व्हावी यासाठी संख येथे गुड्डापूर रस्त्यालगत असलेले मठ परिसरात लवकरचं पाच हजार जनावारासाठी चाराछावणी उभी करून मोफत चारा उपलब्ध करून दिला जाणार आहेत.अशी माहिती तुकाराम महाराज यांनी दिली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.