जतच्या रस्त्यासाठी 7 कोटीचा निधीस मंजूरी ; आ. विलासराव जगताप

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 7 कोटी 4 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील 21 रस्त्यांची सुधारणा करण्याची कामे जिल्हा वार्षिक योजना 2018-19 अंतर्गत सुचविली होती. त्यास मंजुरी मिळून जत तालुक्यासाठी 7 कोटी 4 लाखांचा भरीव निधी मिळाला आहे. यामध्ये रा. मा. क्र. 160 ते आसंगी जत गोंधळेवाडी ग्रा. मा. क्र. 62 सुधारणा करणे (25.00 लक्ष), आक्कळवाडी ते बालगाव रस्ता ग्रा. मा. क्र.206 सुधारणा करणे (38.00 लक्ष),  दरीबडची ते सिद्धनाथ ग्रा. मा. क्र.35 सुधारणा करणे (35.00 लक्ष), डोर्ली ते मानेवाडी हिवरे ग्रा. मा. क्र.35 सुधारणा करणे (48.00 लक्ष), तिप्पेहळ्ळी ते रेवनाळ ते शेगाव ग्रा. मा. क्र. 335 सुधारणा करणे (कि. मी. 2/00 ते 6/00 ) (40.00 लक्ष), येळवी ते प्रजीमा 69 ग्रा. मा. क्र.357 सुधारणा करणे (25.00 लक्ष), मेंढीगिरी ते येळदरी . मा. क्र.22 सुधारणा करणे (25.00 लक्ष), बिळूर ते सिंदूर ग्रा. मा. क्र. 278 सुधारणा करणे (भाग सिंदूर ते प्रजीमा 64) (35.00 लक्ष), इजीमा 197 ते (माडग्याळ) नवटाकवाडी ग्रा. मा. क्र. १६८ सुधारणा करणे (15.00 लक्ष), शेगाव उमदी ते रा. मा.155 ला जोडणारा ग्रा. मा. क्र. 186 सुधारणा करणे (15.00 लक्ष), असा ग्रामीण मार्गासाठी 3 कोटी 1 लाख निधी मंजूर आहे. तसेच उमराणी सिंदूर बेरडहट्टी रस्ता इजीमा 195 (भाग सिंदूर बेरडहट्टी) कि. मी. 10/800 ते 14/800 सुधारणा करणे (85.00 लक्ष), खैराव पडोळकरवाडी लकडेवाडी उटगी इजीमा 211 सुधारणा करणे (30.00 लक्ष), बिळूर वाज्रवाड सिंदूर इजीमा 194 सुधारणा करणे (40.00 लक्ष), वळसंग रा. मा. 155 पासून सोरडी तिल्याळ मार्ग इजीमा 196 सुधारणा करणे (भाग सोरडी ते तिल्याळ) (30.00 लक्ष),  उटगी ते जाडरबोबलाद ते शिरसिंगी ते जिल्हा हद्द इजीमा 210 सुधारणा करणे (18.00 लक्ष), माडग्याळ लकडेवाडी जाडरबोबलाद ते लवंगा ते जिल्हा हद्द इजीमा 197 सुधारणा करणे (20.00 लक्ष), खैराव पडोळकरवाडी लकडेवाडी उटगी इजीमा 211 सुधारणा करणे (20.00 लक्ष), मोरबगी प्रमुख राज्य मार्ग 8 माणिकनाळ कनकनाळ राज्य हद्द इजीमा 213 सुधारणा करणे (50.00 लक्ष), देवनिंबर्गी सुसलाद हल्ली बेळोडगी भिवर्गी तिकोंडी यत्नाळ इजीमा 200 सुधारणा करणे (50.00 लक्ष), शिगन्नहळ्ळी आवंढी वायफळ काराजंगी इजीमा 187 सुधारणा करणे (भाग आवंढी शिगन्नहळ्ळी) (50.00 लक्ष), जालीहाळ बु. ते लवंगा इजीमा 205 जालीहाळ बु. गावाजवळ पूल बांधणे (10.00) असा इतर जिल्हा मार्गासाठी 4 कोटी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच सदर कामे सुरु होतील.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.