सांगली :डफळापूर येथे पेयजल पाणी पुरवठा योजनेचे गावभागात आलेल्या पाण्याचे जलपूजन
पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी डफळापूर येथील काही ग्रामस्थांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेवून गावचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत निवेदन दिले होते. मंजूर असलेली ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत राज्यमंत्री श्री. खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. यानुसार काम सुरू होवून या योजनेचे पाणी संबंधित गावाला मिळाले आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असताना स्थानिक ग्रामस्थांच्या विनंतीला मान देवून राज्यमंत्री श्री. खोत यांनी हे जलपूजन केले.