शिवप्रताप मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या जत शाखेचा सोमवारी शुभारंभ

0


Rate Card

जत,प्रतिनिधी : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑफ,क्रेडिट सोसायटी लि.विटा या संस्थेच्या जत शाखेचा सोमवार ता.17 डिंसेबर सकाळी 11 वाजता शुभारंभ सोहळा आयोजित केला अाहे.या सोहळा आ.डॉ. विश्वजित कदम,कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक,चेअरमन प्रतापशेठ साळुंखे यांनी दिली. या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उमराणी रोडवरील एल.आय.सी.ऑफिस जवळ संस्थेची अत्याधुनिक व प्रशस्त शाखा सुरू होत अाहे.

विट्यातून सुरू झालेल्या संस्थेने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे.संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेत कोअर बँकिंग कार्यप्रणालीची सेवा दिली जाते.100 कोटीकडे वाटचाल असलेल्या या संस्थेत लाईट बिल,फोन,मोबाईल बिल भरणा,डीटीएच रिचार्ज,राष्ट्रीयकृत्त बँकांचे भरणा/विथड्रॉल,इन्शुरन्स हप्ते,एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस सुविधा,डीडी काढण्याची सोय,पँनकार्ड,पासपोर्ट काढण्याची सोय येथे उपलब्धं आहेत.त्याशिवाय महिलांसाठी खास कर्ज योजना,फॅमिली सेव्हींद अकौंट,जेष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर, वाहन,घर,व्यवसाय तारण कर्ज,वैयक्तिक कर्ज योजना,लॉकर्स सुविद्या, जेष्ठासाठी घरपोच योजना सेवा,शिवप्रगती ठेव,तात्काळ बँकिग सुविद्या,कुमार बचत ठेव योजना,वैभवलक्ष्मी कर्ज ठेव,फॅमिली सेव्हिंग ठेव अशा विविध बँकिग क्षेत्रातील योजना या संस्थेतून जतकरांना उपलब्धं होणार आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.