जत,प्रतिनिधी : शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑफ,क्रेडिट सोसायटी लि.विटा या संस्थेच्या जत शाखेचा सोमवार ता.17 डिंसेबर सकाळी 11 वाजता शुभारंभ सोहळा आयोजित केला अाहे.या सोहळा आ.डॉ. विश्वजित कदम,कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक,चेअरमन प्रतापशेठ साळुंखे यांनी दिली. या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उमराणी रोडवरील एल.आय.सी.ऑफिस जवळ संस्थेची अत्याधुनिक व प्रशस्त शाखा सुरू होत अाहे.
विट्यातून सुरू झालेल्या संस्थेने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे.संपुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेत कोअर बँकिंग कार्यप्रणालीची सेवा दिली जाते.100 कोटीकडे वाटचाल असलेल्या या संस्थेत लाईट बिल,फोन,मोबाईल बिल भरणा,डीटीएच रिचार्ज,राष्ट्रीयकृत्त बँकांचे भरणा/विथड्रॉल,इन्शुरन्स हप्ते,एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपी