डफळापूर जि.प.शाळेत भरला बालचमुंचा आठवडा बाजार

0

जत,प्रतिनिधी : शाळेच्या आवारात भाजी मंडईची लगबग, ‘भाजी घ्या भाजी’ चा आरडाओरडा, गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या हे सगळे डफळापूर येथील जि. प. मुलींची शाळा नंबर 2 येथे पहावयास मिळाले.येथील  विद्यार्थिनींनी शाळेतच आठवडा बाजार भरवला होता. यावेळी गावातील नागरिकांनी शाळेत येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या. डफळापुर परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजी-पाला सोमवारी बाजारात न जाता थेट शाळेत भरवलेल्या बाजारातच विकायला आणल्‍यामुळे शाळेत आठवडी बाजाराचे वातावरणच तयार झाले होते. व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी या हेतूने प्रेरित होऊन ह्या आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले.  बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला कांदे,बटाटे, टोमॅटो विविध प्रकारचा भाजीपाला, सरबत,पानीपुरी,भेळ, इत्यादी खाद्यपदार्थ, मेकअप साहित्य,प्लॅस्टिकची भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजारात सर्वात जास्त गर्दी पहायला मिळत होती ती म्हणजे खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर.सर्व ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला. दोन अडीच तासांच्या बाजारात 6 ते 8 हजार रुपये एवढी विक्री विद्यार्थ्यांनी केली.पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पालकवर्गाची आपल्या पाल्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रगतशील शेतकरी संदीप माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डफळापूर गावचे सरपंच बालिका चव्हाण,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी, एस.एम.सी.अध्यक्ष विकास शिंदे  उपाध्यक्ष हणमंत कोळी, अध्यक्ष संजय सूर्यवंशी, शिक्षणप्रेमी धनाजी चव्हाण, रणजीत सज्जन चव्हाण, सचिन चव्हाण, आशाराणी अभिजित चव्हाण, कल्पना प्रकाश कोरे, ज्योती उमेश सावळे हे उपस्थिती लावली. केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले व मुख्याध्यापिका सौ. रेखा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री मगदूम, मनीषा शिंत्रे, आरती कांबळे, अजंता लोंढे, शंकर कुंभार, उद्योगरत्न संकपाळ या शिक्षकांनी हा उपक्रम राबविला. 

Rate Card

डफळापूर जि.प.2 मध्ये बालचमुंचा भरलेला बाजार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.